मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी झाला. कारण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट आहे. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो. आता त्यापेक्षा तिप्पट मोठे बंदर वाढवणमध्ये होत आहे. या बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते. पण ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे. मोदी यांचे सरकार आले आणि वाढवण बंदर सुरू करण्याच्या कामाला वेग आला. कोर्टाच्या नोटिफिकेशनमधून वाढवण बंदर बाहेर आले. नरेंद्र मोदी यांनी त्याला नॅशनल पोर्टचा दर्जा दिला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आता पुढील २०० वर्ष हे बंदर राहील आणि मोदींचं नावही राहील. भारताला पुढे नेण्याचे काम मोदींनी केले. हे बंदर पाहून लोक म्हणतील. जगातील सर्व एअरपोर्ट रिक्लमेन्शन करून तयार केले आहे. येत्या काळात मुंबई वाढणार आहे. वसई विरारमध्ये वाढणार आहे. आपण बंदराचं रिक्लेमेन्शन करणार आहोत. या ठिकाणी एअरपोर्टचेही रिक्लेमन्शन केले पाहिजे. या ठिकाणी तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. 76 हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी ते आले. त्यावेळी काही स्थानिकांकडून या बंदराला विरोध होत असल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले की, वाढवण बंदरामुळे परिसराचा चौफेर विकास होणार आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. विकासासाठी थोडी पावले मागे पुढे जावे लागणार आहे. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो वाढवण परिसरातील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत वाडवण बंदरच्या कामाला मंजुरी देण्यात आली. गेली ३५ वर्षे वाढवण बंदर होण्याचा प्रयत्न सुरू होता. पण नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच हे काम होण्याचे इतिहासात लिहिले असेल. या बंदरामुळे दोन ते तीन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. जगातील दहा बंदरांपैकी एक बंदर असणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्र आणि पालघरला होणार आहे. या ठिकाणी मत्स्यपालन होत आहे. समुद्रापासून दहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर होणार आहे. त्याचा मोठा फायदा आम्हाला होणार आहे.