Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदे यांना अखेर कोणते खाते मिळाले? सर्वाधिक चर्चेतील गृहविभाग कोणाकडे?

| Updated on: Dec 22, 2024 | 1:33 PM

भाजपमध्ये खाते वाटपात चंद्रशेखर बावनकुळे वरचढ ठरलेले दिसून येते आहे. गृह विभागानंतर सर्वात महत्वाचे असणारे महसूल खाते राधाकृष्ण विखे यांच्याकडून काढून त्यांना देण्यात आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कामठी मतदारसंघात भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते.

Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदे यांना अखेर कोणते खाते मिळाले? सर्वाधिक चर्चेतील गृहविभाग कोणाकडे?
Follow us on

Maharashtra Cabinet Portfolio Allocation : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तारात सर्वाधिक चर्चा गृहविभागाची झाली होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला होता. २३ नोव्हेंबर रोजी निकाल आल्यानंतर ५ डिसेंबर रोजी शपथविधी झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी झाली. आता २१ डिसेंबर रोजी खाते वाटप झाले. महायुतीला प्रचंड बहुमत असताना हा कालावधी लागला. त्याला कारण महत्वाची खाती आहे.

तिन्ही पक्षांना महत्वाची खाती हवी होती. त्यातच गृहविभाग भाजप शिवसेनेला देण्यास तयार नव्हता. एकनाथ शिंदे यांनी मागील मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असताना गृहमंत्रीपद भाजपकडे दिले होते. तिच मागणी शिवसेना करत होती. अखरे यासंदर्भात दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यामुळे खाते वाटपात कालावधी लागला.

खाते वाटपात चंद्रशेखर बावनकुळे वरचढ

भाजपमध्ये खाते वाटपात चंद्रशेखर बावनकुळे वरचढ ठरलेले दिसून येते आहे. गृह विभागानंतर सर्वात महत्वाचे असणारे महसूल खाते राधाकृष्ण विखे यांच्याकडून काढून त्यांना देण्यात आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कामठी मतदारसंघात भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना मैदानात उतरविले होते. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून दमदार कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. त्यामुळे शपथविधी सोहळ्यात त्यांना तिसऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर त्यांना स्थान देण्यात आले. त्यानंतर आता खाते वाटपात त्यांना महत्वाचे महसूल खाते दिले. त्यामुळे सरकारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे जोरदार कमबॅक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्थ खाते अजित पवार यांच्याकडेच

अर्थ खात्याबाबत वेगवेगळी चर्चा सुरु झाली होती. अर्थ खाते अजित पवार यांच्याकडून जाणार असल्याची चर्चा होती. परंतु अर्थ खाते पुन्हा अजित पवार यांना देऊन फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित दादांची दादागिरी मान्य करण्यात आली. अजित पवार यांच्या पक्षातील हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण खाते दिले आहे. धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते दिले आहे.

मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा…