राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल ट्रेन सुरु करु, रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण

| Updated on: Aug 27, 2020 | 10:06 PM

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Mumbai Local Train) .

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल ट्रेन सुरु करु, रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई : लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत (Mumbai Local Train). त्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही नियम आणि अटी ठेवून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करता येईल. मात्र, त्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Mumbai Local Train).

“लोकल सुरु करा, अशी प्रवाशांची मागणी आहे. लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करु”, असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी दिलं आहे.

लोकलचा वापर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच करता येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी अद्याप लोकलने प्रवास करता येत नाही. लॉकडाऊननंतर 15 जून रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरु झाल्या होत्या.

लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानली जाते. मात्र, कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहेत. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर तीन महिन्यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना अजूनही लोकलचा प्रवास करता येत नाही. त्यामुळे लोकल सुरु करा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा : ‘मोदी सरकारच्या आडमुठेपणाला विरोध’, काँग्रेसची जेईई-नीट परीक्षेविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा