मुंबई: ऐन दिवाळीच्या उत्सवात मध्य रेल्वेने (Central railway) मुंबईकरांना (mumbaikar) झटका दिला आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह (csmt) सहा रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचे तिकीट चारपटीने वाढवले आहे. या सहाही रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मचे तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांनो, या स्थानकातील प्लॅटफॉर्मवर जाताना खिसा पाहूनच जा. नाही तर माघारी परतावं लागेल.
मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत चारपटीने वाढवली आहे. आज 22 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंतच ही तिकीट दर वाढ असणार आहे, असं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या प्रमुख सहा रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असते. सणासुदीमुळे ही गर्दी आणखीनच वाढलेली आहे. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने या सहाही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 10 रुपयांवरून 50 रुपये केली आहे. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ही दरवाढ असणार आहे.
In order to prevent overcrowding of passengers at CSMT, Dadar, Thane, Kalyan, LTT and Panvel railway stations, platform ticket fare at these stations has been increased to Rs 50 from October 22 to October 31 (as a temporary measure): Central Railway pic.twitter.com/x6EV3MkH8G
— ANI (@ANI) October 21, 2022
यापूर्वी दक्षिण रेल्वेनेही प्लॅटफॉर्मच्या तिकिटात वाढ केली आहे. चेन्नई मंडळाच्या आठ प्रमुख रेल्वे स्थानकात ही वाढ करण्यात आली आहे. चेन्नई सेंट्रल, चेन्नई एगमोर, तांबरम, काटपाडी, चैंगलपट्टू, अरक्कोनम, तिरुवल्लूर आणि अवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्यात आली आहे. ही तिकीट 1 ऑक्टोबर ते 31 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे.
त्याशिवाय आंध्रप्रदेशातही उत्सवाची प्रचंड गर्दी होत असल्याने विजयावाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 10 रुपयांवरून 30 रुपये करणअयात आली आहे. तसेच तेलंगणाच्या काचीगुडा रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीटही 20 रुपये करण्यात आली आहे.