लोकलचा पेंटग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

| Updated on: Apr 04, 2024 | 2:38 PM

लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणकडून कसारा आणि कर्जत तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवर देखील याचा परिणाम झाला आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

लोकलचा पेंटग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Follow us on

कल्याण : मुंबईहून कल्याणला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान जलद ट्रॅकवर जाणाऱ्या लोकल गाडीच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावरती वळवण्यात आल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे,

मध्य रेल्वे विस्कळीत

लोकलचा पेंटग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. मुंबईहुन कल्याणकडे आणि कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक अनिश्चित वेळेनुसार धावत आहे. मुंबईहून कर्जत आणि कसाराकडे जाणारी वाहतुक खोळंबली आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या देखील खोळंबल्या आहेत.