राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी माजली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांचं ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकाने विधानसभेच्या राजकीय मैदानात एंट्री केली आहे. या पुस्तकात धक्कादायक दावे आहेत. या पुस्तकातून अनेकांचा पर्दाफाश करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. या पुस्तकात काय असले याची उत्सुकता ताणलेली असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध छेडल्या गेले आहे. आता चंद्रकांत दादांनी अनिल देशमुखांना असा चिमटा काढला आहे.
माझ्याविरोधात राजकीय कट
केंद्र सरकारच्या आशीवार्दाने आपल्या मागे ईडी, सीबीआय मागे लागली. मला जेलमध्ये टाकण्यात आले. कशा पद्धतीने माझ्याविरोधात राजकीय कट करण्यात आला. याची सर्व माहिती मी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात दिल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला. सरकारचा एक दूत समित कदम आपल्यावर सातत्याने दबाव आणत होता. खोटं शपथपत्र सादर करण्यास सांगत होता, असा आरोप देशमुखांनी केला.
चंद्रकांत दादा पाटील यांची टीका
नुसत्या गोट्या फेकण्यात काय अर्थ नाही, पुरावे द्या. चंद्रकांत पाटील यांची अनिल देशमुख यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. नुसत्या गोट्या फेकण्यात काय अर्थ नाही, पुरावे असतील तर द्या असे आवाहन भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर दिले आहे.
मनोज जरांगे यांना केला असा सवाल
मनोज जरांगे पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी सवाल विचारला आहे. आमचे चुकले काय? कधीं न दिलेले आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले , उध्दव ठाकरे यांच्या काळात गेले एकनाथ शिंदेंच्या काळात दिले हे चुकलं का? राज्यात 78 हजार कुणबी नोंदी सापडल्या. या सगळ्यात आमची चूक झाली का? जरांगे समजून घेणार नसतील तर सामान्य मराठा समाज समजून घेईल. मनोज दादा खऱ्याला खरे म्हणायला शिका. आम्ही आजूनही कागदपत्रे घेऊन चर्चेला बसायला तयार आहे. आमचे चुकले काय हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी जरांगे पाटील यांना दिले.
त्यांनी संगमनेर येथील घटनेवर पण प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीने म्हणणे हा त्याचा व्यक्तीचा दोष असू शकतो. ते आमच्या पक्षाचे ते कल्चर नाही. जे कोण देशमुख बोलले आहेत त्याना सर्वांनी समजावून सांगितले आहे. आपल्या बोलण्यात सर्वांनीच आदर व्यक्त केला पाहिजे, असे ते म्हणाले. राज्यात पराभूत 17 लोकसभामध्ये 130 विधासभेत भाजपाच पुढे आहे. त्यामुळे आम्ही पिछाडीवर आहोत याबाबत विरोधक हवेत आहे. याचा आम्हालाच फायदा होईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.