काँग्रेसला चांगलं नेतृत्व नाही, ‘पदवीधर’वरून भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केली…

| Updated on: Jan 18, 2023 | 4:24 PM

काँग्रेस पक्षामध्ये तीस तीस वर्षे राहून आपले आयुष्य वाया घालवण्यासाठी राजकीय व्यक्ती आता इच्छूक नाहीत. कारण काँग्रेस पक्षाला आता चांगले नेतृत्व राहिले नाही.

काँग्रेसला चांगलं नेतृत्व नाही, पदवीधरवरून भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केली...
Follow us on

नागपूरः नाशिकमधील पदवीधर मतदार संघाच्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे काँग्रेसचे सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्या राजकीय भूमिकेमुळे काँग्रेसह महाविकास आघाडी संभ्रमात असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची भूमिका काय असणार हे स्पष्ट केले आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी जर भाजपकडे पाठिंबा मागितला तर यावर भाजपकडून समर्थन देण्यासाठी राज्य आणि केंद्रीय समितीकडे त्याचा पाठपुरावा केला जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगताना म्हणाले की, 2047 पर्यंत काँग्रेसची अवस्था वाईट असणार आहे. कारण काँग्रेसमध्ये शेवटच्या पातळीवर काम करण्यासाठी माणसं तयार नाहीत.

कारण काँग्रेसमधील नेते, आमदार, खासदार हे आपल्या मुलाला आमदार आणि खासदार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षामध्ये तीस तीस वर्षे राहून आपले आयुष्य वाया घालवण्यासाठी राजकीय व्यक्ती आता इच्छूक नाहीत. कारण काँग्रेस पक्षाला आता चांगले नेतृत्व राहिले नाही. त्यामुळे काँग्रेसचा राजकीय प्रवास अवघड असल्याचे मतही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला तर त्यांना त्याचा निर्णय हा राज्य आणि केंद्रीय समिती घेणार आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविला तरी या निवडणुकीत भाजप अपक्ष पक्षाच्याच भूमिकेत असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.