गिरीश गायकवाड, गोविंद ठाकूर, मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला आहे. काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि काशिफचे काय संबंध आहेत हे उघड झालं. पाहिजे. अस्लम शेख यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन नवे गौप्यस्फोट केले. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. अस्लम शेख यांना काशिफ खान वारंवार पार्टीला बोलावत होता. ओळख नसलेला माणूस एकदा अमंत्रित करेल, ओळख असल्याशिवया वारंवार कसे बोलावेल? एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो? असा सवाल करतानाच अस्लम शेख यांचे कॉल रिकॉर्ड चेक केले पाहिजे. नवाब मलिकांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. अस्लम शेखचाही काशिफ सोबत संबंध होते त्यांचेही कॉल रेकॉर्ड चेक झाले पाहिजे. अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचा आहे. मी फक्त कोण मंत्री यात आहे असं मी विचारलं होतं? मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मलिक यांनीच नाव घेतलं, असं कंबोज म्हणाले.
अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना काशिफ खानने पार्टीत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. किती वेळा हे निमंत्रण दिलं? या मुलांसोबत काशिफची कुठे बैठक झाली? काशिफ खानचे आणि या नेत्यांच्या मुलांचे काय संबंध आहेत? याचीही चौकशी झाली पाहिजे. बरं झालं मलिक यांनीच ही माहिती उघड केली. आता सर्वच बाहेर येईल, असंही ते म्हणाले. राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत याची माहिती मलिक यांना द्यावी लागेल. कारण मलिक यांची ही जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले.
मलिक यांनी ज्या वरळी हॉटेलचं नाव घेतलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही. त्यांचा आरोप खोटा आहे. मलिक आता इतरांची संपत्तीही माझीच म्हणून दाखवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी माझ्यावर 1100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. मी निवडणूक लढवली. त्यात साडेतीनशे कोटीची संपत्ती असलाचं मी जाहीर केलं. प्रतिज्ञापत्रंही दिलं आहे. मी कोणता फ्रॉड केला ते सांगा. हे खोटे आरोप आहेत. मी व्यापारी व्यक्ती आहे. मी वर्षाला पाच कोटीचा टॅक्स भरतो. माझे अनेक व्यवसाय आहे. मी काहीच लपवत नाही, असा खुलासाही त्यांनी केला.
मलिक यांची मुलं 47 लाखाची इन्कम दाखवून मोठमोठी प्रॉपर्टी घेत आहेत. या प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझा आवाज दाबला जात आहे. माझा आवाज दाबू शकतील, मला बसवू शकतील असं त्यांना वाटतं. मला घाबरवू असं त्यांना वाटतं. पण मी त्यांना घाबरत नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, कोणतीही केस करा. मी घाबरणार नाही, असंही ते म्हणाले.
सुनील पाटीलशी त्यांची चर्चा झाल्याचं त्यांनी कबूल केलं. विजय पगारेशीही त्यांची चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. सुनील पाटीलद्वारे राष्ट्रवादीने हे षडयंत्र रचलं आहे. जसजसे ते एक्सपोज होत आहेत ते खोटे आरोप घेऊन बाहेर येत आहेत, असा दावाही त्यांनी केला. यांचा सुनील पाटील एक्सपोज झाला आहे. सुनील पाटील सॅम डिसूझाशी काय संबंध आहे हे त्यांनी सांगावं. हे काही गोष्टी लपवत आहेत. त्यामुळे आता ते पर्सनल अटॅक करत आहेत. मलिक यांच्या स्टॅटेजीचा हा पार्ट आहे. सुनील पाटीलशी राष्ट्रवादीचे काय संबंध आहेत? असा सवाल त्यांनी केला. तसेच गेल्या पाच वर्षात हॉटेल ललितला गेलो नाही. सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. मी पुरावे घेऊन बोलतो. हवेत बोलत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 7 November 2021-tv9 pic.twitter.com/acpOOV9xbw
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 7, 2021
संबंधित बातम्या:
तो तेरा बेटा लंबा जायेगा… शाहरुख खानलाही घाबरवण्याचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा
अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार, ईडीची हायकोर्टात धाव, न्यायालयीन कोठडीला चॅलेंज
(check aslam shaikh’s call recorde, mohit kamboj’s demand)