छगन भुजबळ त्यांच्या 2 वक्तव्यांवरुन आले भाजप नेत्यांच्या निशाण्यावर

| Updated on: May 28, 2024 | 9:25 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच महायुतीमध्ये विधानसभेच्या जागांवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या दोन वक्तव्यांमुळे ते भाजप नेत्यांच्या निशान्यावर आले आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ त्यांच्या 2 वक्तव्यांवरुन आले भाजप नेत्यांच्या निशाण्यावर
Follow us on

छगन भुजबळ हे त्यांच्या 2 वक्तव्यांवरुन भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. 400 पारच्या नाऱ्यामुळं, महाराष्ट्रात निवडणुकीत वेगळा फरक पडला, असं भुजबळ म्हणाले आहेत. तसंच विधानसभेत 80-90 जागांचं आश्वसन दिल्याचं भुजबळ म्हणाले होते. त्यावरुन मुनगंटीवारांनी पुरावाच मागितला आहे. 400 पारच्या नाऱ्यामुळंच, संविधान बदलणार असा दलित समाजाच्या मनात भावना झाली आणि त्यामुळंच महाराष्ट्रातही लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम दिसला. असं रोखठोक विधान अजित पवारांचे मंत्री छगन भुजबळांनी केलं आहे. इकडे भाजपच्या निलेश राणेंनी, भुजबळांना आता आवरलं पाहिजे असा इशारा दिला आहे.

निलेश राणे यांची टीका

श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही. असं निलेश राणे यांनी म्हटले आहे. निलेश राणे यांच्या या टीकेनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेही त्याच भाषेत बोलले. परांजपे म्हणाले की. निलेश आणि नितेश राणेंमुळं भाजपच अनेकदा अडचणीत आली. त्यांना महत्व देत नाही.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होताच, भाजपनं 400 पारचा नारा दिला. आणि देशभरात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंपासून ते राहुल गांधीपर्यंत संविधान बदलणार असल्याचा हल्लाबोल केला.

भुजबळ बेधडकपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. पण 400 पारच्या नाऱ्यामुळं महाराष्ट्रात परिणाम झाला, असं म्हणणारे महायुतीचे पहिले नेतेही तेच आहेत. पण फक्त 400 पार वरुनच नाही, तर लोकसभेच्या निकालाआधीच विधानसभेच्या जागांवरुन भुजबळ ज्या पद्धतीनं बोलले, त्यावरुन भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांनाही ते पटलेलं नाही. 80-90 जागांचं देण्याबद्दल भाजपनं सांगितलंय, असं भुजबळ म्हणाले. तर कोणी आश्वासनाचा पुरावाच भाजपचे मंत्री मुनगंटीवारांनी मागितला आहे.

लोकसभेचं गणित काय

लोकसभेला भाजपनं 28 जागा लढल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 15 जागा आल्या. तर शिंदे गटाऐवढ्या जागा मागणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. जानकरांच्या रासपला 1 जागा मिळाली.

विधानसभेचा विचार केला तर, सध्या भाजपचे स्वत:चे 105 आमदार आहेत आणि अपक्षांसह आकडा 114 आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वत:चे 41 आमदार आहेत, आणि अपक्ष 10 आमदार आहेत. अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. एकूण आमदारांची संख्या होते 205
आणि विधानसभेचं संख्याबळ आहे 288. म्हणजेच 83 जागा शिल्लक उतरतात. याच 83 जागांमध्ये तिघांमध्ये वाटप होईल.

लोकसभेत शिंदे गटाकडे 14 खासदार होते आणि अजित पवार गटाकडे एकच खासदार होता. पण आता शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे जवळपास स्वत:चे सारखेच आमदार आहेत. त्यामुळं दोन्ही गटात वाटप सारखचं व्हावं असं भूजबळ म्हणत आहेत.