‘आंदोलनजीवी’ कोण?; छगन भुजबळांनी भाजपला सुनावले

| Updated on: Feb 09, 2021 | 2:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. (chhagan bhujbal slams bjp over andolan jivi remark)

आंदोलनजीवी कोण?; छगन भुजबळांनी भाजपला सुनावले
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. (chhagan bhujbal slams bjp over andolan jivi remark)

राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज छगन भुजबळ यांचा जनता दरबार पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. आंदोलने ही जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही आंदोलन असायचं. कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बस, वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली. सभागृहात त्यांनी आंदोलने केली याची आठवणही छगन भुजबळ यांनी यावेळी करून दिली. आंदोलनजीवी अशा पध्दतीने हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान – सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

मग आणखी दुसरं काय करायचं?

लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते. मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही त्यांनी केला.

खरे मोदी कोण?

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला. त्यांच्या निरोपाच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरून गेले होते. त्यावरूनही भुजबळांनी मोदींवर टीका केली आहे. आज कुणीतरी मला व्हॉटस्ॲपवर पाठवलं आहे की, मोदी गहिवरलेसुध्दा त्यामुळे नक्की हे खरे की ते खरे हे मोदींनाच विचारायला हवे खरे मोदी कोण?, असा सवालही त्यांनी केला.

मोदी टीकाही करतात आणि…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर टीका पण करतात. यूटर्न केल्याचा आरोपही करतात आणि युतीसुध्दा करतात, असा चिमटाही त्यांनी काढला. (chhagan bhujbal slams bjp over andolan jivi remark)

 

संबंधित बातम्या:

फडणवीसांच्या योजनेचं काऊंटडाऊन सुरु, ‘जलयुक्त शिवार’च्या प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात

…आणि अजितदादांच्या एका फोनमुळे जालिंदर काकांवर उपचार, पवारांचं हळवं रुप पुन्हा जगासमोर

नाना पटोले म्हणतात, काँग्रेसला नंबर 1चा पक्ष बनवणार पण कसे?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

(chhagan bhujbal slams bjp over andolan jivi remark)