२३ वर्षांनी निकाल, मुंबईतील बहुचर्चित जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजन दोषी, जन्मठेपेची शिक्षा

| Updated on: May 30, 2024 | 3:14 PM

Chhota Rajan Convicted: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या 4 मे 2001 झाली होती. या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड करण्यात आला. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

२३ वर्षांनी निकाल, मुंबईतील बहुचर्चित जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजन दोषी, जन्मठेपेची शिक्षा
rajan
Follow us on

Chhota Rajan Convicted: मुंबईतील बहुचर्चित 2001 मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 23 वर्षांनी आला आहे. जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी अंडर डॉन छोटा राजन दोषी ठरला आहे. त्याला मकोका (महाराष्ट्र संघटीत अपराध नियंत्रण अधिनियम) अंतर्गत न्या. ए.एम.पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

2001मध्ये केली होती जया शेट्टीची हत्या

हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या 4 मे 2001 झाली होती. या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड करण्यात आला. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. राजन गँगने रवी पुजारीमार्फत जया शेट्टीकडून 50 कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना साल 2013 मध्येच कोर्टानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आता छोटा राजन यालाही शिक्षा झाली आहे.

छोटा राजन तिहार कारागृहात

छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. त्याला इंडिनेशियामध्ये अटक करुन ऑक्टोंबर 2015 मध्ये भारतात आणले गेले. तेव्हापासून तो नवी दिल्लीतील तिहारमधील जेल नंबर 2 मध्ये आहे. हा सेल उच्च सुरक्षा असणारा आहे. कधीकाळी दाऊद इब्राहीमचा जवळचा असणारा छोटा राजन 1993 मुंबईतील सीरियल बॉम्बस्फोटानंतर दाऊद गँगपासून वेगळा झाला होता. त्यानंतर दोन्ही गटात गँगवार होत राहिले होते. छोटा राजनेचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. त्याचा जन्म 13 जानेवारी 1960 मध्ये झाला.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी छोटा राजन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि ‘स्कूप’ या वेब सिरीजचे निर्माते मॅचबॉक्स शॉट्स एलएलपीच्या मालकांविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात (एचसी) धाव घेतली होती. आपल्या दाव्यात राजनने चित्रपट निर्मात्याने आपला फोटो आणि आवाज वापरल्याबद्दल आक्षेप घेतला होता.