निवडणुकीची घोषण्या होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षी २६००० रुपये बोनस म्हणून देण्यात आला होता. बालवाडी शिक्षक आणि आशा वर्कर्स यांनाही बोनस मिळणार आहे.
राज्यसभा खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल लेबर युनियनने बीएमसी कर्मचाऱ्यांना 40,000 रुपये बोनस म्हणून देण्याची मागणी केली होती. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 नोव्हेंबर रोजी बीएमसी कर्मचाऱ्यांना 26,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. जो यंदा तीन हजाराने वाढवण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेस खासदाराच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा जागेवपही २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष, 4.66 कोटी महिला आणि 20.93 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत.