पणजीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणाला मोठा हादरा बसला होता, आताही एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एक धक्का दिला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मध्यरात्रीनंतर गोव्यात दाखल झाले आहेत, तेही त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्यासोबत ते गोव्यातील हॉटेल ताजकडे (Goa Tour)रवाना झाले आहेत. दोघे गोव्यात दाखल झाले असले तरी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मध्यरात्री झालेल्या भेटीबाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात सव्वातास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून खातेवाटपाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या भेटीवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोहित कंबोजही उपस्थित होते. मुंबईतील त्यांच्या या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले मात्र त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. यावेळी त्यांनी अशा भेटी होताच राहणार एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे साडेतीन वाजता गोव्यात दाखल झाल्याने आता राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे. मुंबईत मध्यरात्री उपमुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर थेट गोव्यात मुख्यमंत्री दाखल झाल्याने राजकीय चर्चंना उधान आले आहे. मुख्यमंत्री मुंबईहून तात्काळ गोव्यात दाखल का झाले आहेत, ते कारण मात्र समजू शकले नाही.
मुख्यमंत्री पहाटे गोव्यात दाखल झाले असले तरी त्याचे नेमके कारण समजू शकले नाहीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे साडेतीन वाजता गोव्यात दाखल झाल्याने आता राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे. मुंबईत मध्यरात्री उपमुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर थेट गोव्यात मुख्यमंत्री दाखल झाल्याने राजकीय चर्चंना उधान आले आहे. मुख्यमंत्री मुंबईहून तात्काळ गोव्यात दाखल का झाले आहेत, ते कारण मात्र समजू शकले नाही., मात्र गोव्यामध्ये जे बंडखोर आमदार थांबले आहेत, त्यांची भेट घेऊन आज सकाळी बंडखोर आमदारांसोबत बैठक असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईत मध्यरात्री नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सव्वा तास चर्चा केल्यानंतर गोव्याकडे रवाना झालेले मुख्यमंत्री साडेतीन नंतर गोव्यात दाखल झाले. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या गोवा दौऱ्याबाबत अनेक जणांनी आश्चर्य वाटत आहे. गोव्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दाखल झाल्यानंतर आज सकाळी 39 आमदारांबरोबर बैठक होणार आहे. त्याबैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन गोव्याहून मुंबईकडे निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या अचानक झालेल्या गोवा दौऱ्याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.