मुंबई | 15 मार्च 2024 : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात राज्यभरातून इनकमिंग सुरु आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात देशभराही चर्चा होत आहे. आता राजस्थानमधील भरतपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार डॉ. ऋतू बनावत यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. आमदार डॉ. ऋतू बनावत यांच्या पक्ष प्रवेशाने राजस्थानमध्ये शिवसेनेचे खाते उघडले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
ऋतू बनावत यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज खूप आनंदाचा दिवस आहे. ऋतू बनावत यांचे शिवसेनेत मी स्वागत करतो. अपक्ष लढून त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला. त्यांनी आतापर्यंत अनेक चांगली कामे केली आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. मी पण सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करता करता राज्याचा मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. आता माझ्यासोबत 50 आमदार, 13 खासदार आणि लाखो कार्यकर्ता आहेत. देशातील 23 राज्याचे शिवसैनिकांनी मला पाठिंबा दिला. मी जेव्हा उठाव केला, तेव्हा ही सर्व सोबत होती. सर्व ठिकाणी शिवसेना काम करत आहे. शिवाजी जी महाराज आणि महाराणा प्रताप दोघे महान आहे. मी पाच रुग्णवाहिका तुमच्या परिसरासाठी देत आहे.
माझा आणि शिवसेनेच्या विचार एक आहे. म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहे. मी एक सामान्य घराची महिला आहे. लोकांनी मला निवडून दिले. आता मी राजस्थानमध्ये शिवसेनेला मोठ्या करण्यासाठी काम करेल. मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेत संधी दिली, मी त्यांचा आभार मानते.