मुंबई: राज्य सरकारने चंद्रपूरची दारुबंदी उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. यवतमाळमधील दारुबंदीचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी पाटील यांना केला आहे. (chitra wagh reminded jayant patil to his assurance of liquor ban lifting in yavatmal)
चित्रा वाघ यांनी ट्विट करून जयंत पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील जयंत पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. क्या हुवा तेरा वादा….जयंतरावजी. सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
यवतमाळ राहिलं दूर. चंद्रपूरची दारुबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चित्रा वाघ यांनी एक 43 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार असतानाचा विधानसभेतील हा व्हिडीओ आहे. विधानसभेत जयंत पाटील यवतमाळच्या दारुबंदीवर पोटतिडकीने बोलताना दिसत आहेत. कालच मला स्वामिनी जिल्हा दारुबंदी आंदोलनाच्या काही भगिनी भेटल्या. त्यांची मागणी काय होती, यवतमाळमध्ये दारुबंदी करा. आम्ही मध्ये संघर्ष यात्रा केली. त्यावेळी त्या भेटल्या आणि म्हणाल्या दारुबंदी करा. मी त्यांना सांगितलेलं आहे, सुधीरभाऊ करतात की नाही ते बघा. नाही तर आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्याची दारुबंदी करू. हे आश्वासन मी त्यांना दिलं आहे, लिहून घ्या. चंद्रपूरला दारुबंदी होते, त्या महिलांचा साधा प्रश्न आहे की यवतमाळला का होत नाही? आणि सुधीरभाऊ राज्याचे अर्थमंत्री असताना दारुबंदी का होत नाही?, असा सवाल पाटील करताना दिसत आहेत. (chitra wagh reminded jayant patil to his assurance of liquor ban lifting in yavatmal)
क्या हुवा तेरा वादा….जयंतराव जी
सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार…..इस आश्वासन का…
यवतमाळ राहिलं दूर..चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने
महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल pic.twitter.com/okq3isGvmO
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 29, 2021
संबंधित बातम्या:
(chitra wagh reminded jayant patil to his assurance of liquor ban lifting in yavatmal)