Ashish Shelar: आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला कशासाठी?

| Updated on: Dec 02, 2021 | 2:18 PM

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले आहेत. मुंबईत येऊन त्यांनी उद्योगपतींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना टोला लगावला आहे.

Ashish Shelar: आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला कशासाठी?
ashish shelar
Follow us on

मुंबई: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले आहेत. मुंबईत येऊन त्यांनी उद्योगपतींच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. तुम्हीही गुजराती शिकून घ्या. नाही तर तुम्हाला कधी गुजरात दाखवतील याचा पत्ताही लागणार नाही, असा टोला क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जाणार आणि इथे वडापाव खायला घालणार का? असे वक्तव्य केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आशिष शेलार यांना चांगलेच फटकारले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आता गुजरातला उद्योग घेऊन चालले आहेत. आशिष शेलार तुम्ही गुजराती शिकून घ्या नाहीतर कधी तुम्हाला गुजरात दाखवतील पत्ता लागणार नाही, असा जबरदस्त टोला क्रास्टो यांनी गुजराती भाषेत लगावला आहे.

शेलार काय म्हणाले होते?

आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाराष्‍ट्रातील रोजगार, व्‍यवसाय, इंडस्‍ट्रीज इथून घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय? महाराष्‍ट्रात कँग्रेसला ना स्‍थान, ना इज्‍जत, ना किंमत, ना स्थिती त्‍यामुळे काँग्रेसला काय ते त्‍यांचे त्‍यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्‍ट्राचा आहे. महाराष्‍ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्‍ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला होता. ममतादिदी महाराष्‍ट्रातील उद्योगांना आपल्‍या राज्‍यात यायचे आमंत्रण देण्‍यासाठी आल्‍या आहेत. देशभर सर्वत्र उद्योग धंदे असले पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे. मात्र आपल्‍या राज्‍यातील उद्योग तुम्‍ही घेऊन जा, असे महाराष्‍ट्रातील सत्‍ताधारी शिवसेना दिदींना सांगते आहे काय? हा प्रश्‍न आहे, असंही ते म्हणाले होते.

आदित्य ठाकरे-ममतादीदींची भेट कशासाठी?

ममतादीदींचं सरकारने स्वागत केलं. त्याला आमचा आक्षेप नाही. प्रथेप्रमाणे ते योग्यच आहे. पण त्‍यानंतर मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्‍यांची झालेली बैठक कशासाठी होती? महाराष्‍ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्‍नेह असल्‍याचे सांगून या भेटी घेतल्‍या जातात. तुमचा कौटुंबिक स्‍नेह असेलही. आम्‍हाला त्‍याबद्दल काय करायचे आहे? पण महाराष्‍ट्राचा त्‍याच्‍याशी काय सबंध? बांग्‍लादेशीयांना संरक्षण देणाऱ्या ममतादिदी यांच्‍याशी कुठले आले कौटुंबिक संबध? असा सवालही त्‍यांनी केला होता.

 

संबंधित बातम्या:

Video: गोणीवर बॅक फ्लिप आणि गोणी पाठीवर टाकून थेट गोदामात, कामात मजा घेणारा मजूर पाहून नेटकरी भारावले!

Suresh Mhatre | शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस, पाचव्यांदा पक्षांतर, बाळ्या मामा म्हात्रे आता राष्ट्रवादीत

‘इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे, ते उदयोग-धंदे पळवतील ‘ असे होत नाही – अजित पवार