मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कॅबिनेटचा पहिला निर्णय, अर्धा तास चाललेल्या बैठकीत…

| Updated on: Dec 05, 2024 | 8:09 PM

CM Devendra Fadnavis First Design: बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिला कोणता निर्णय घेता? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय पुण्यातील रुग्णासाठी घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कॅबिनेटचा पहिला निर्णय, अर्धा तास चाललेल्या बैठकीत...
devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Follow us on

CM Devendra Fadnavis First Design: मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिला कोणता निर्णय घेता? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय पुण्यातील रुग्णासाठी घेतला. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पाच लाख रुपये देण्याचा निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. मंत्रिमंडळाची ही बैठक अर्धा तास चालली.

पहिली सही रुग्णाच्या फाईलवर

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

अधिक वेगाने काम करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पदाची सूत्र घेतली. त्यानंतर ते पहिल्याच बैठकीत अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी प्रशासनाला अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर झालेल्या बैठकीचे निर्णय जाहीर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. नवीन सरकारची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. यावेळी विधिमंडळ पत्रकार संघातर्फे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सत्कारही करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पत्रकार संघाचे कौतूक करतात. माध्यमे अनेक गोष्टी आमच्या लक्षात आणून देतात. गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवले. ते अधिक गतीने चालले. आता महाराष्ट्र थांबणार नाही. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आग्रही राहणार आहे.