‘रोजचा थयथयाट’, ‘अतिशय पोटदुखी’, ‘धुव्वा उडेल’, उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 05, 2023 | 9:43 PM

"उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढंच मला सांगावसं वाटतं. तेही असं करायला मागे-पुढे पाहणार नाहीत", असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

रोजचा थयथयाट, अतिशय पोटदुखी, धुव्वा उडेल, उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खेडमधील आक्रमक भाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. “त्यांच्याकडून नेहमी शिवसेना-भाजप महायुती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा एकच कार्यक्रम सुरु आहे. त्यांना आरोप करु द्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढंच मला सांगावसं वाटतं. तेही असं करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रात जो बदल घडलाय, केंद्र आणि राज्य सरकारडून विकासाची जी कामे सुरु आहेत त्यामुळे अतिशय पोटदुखी सुरु झालेली आहे. त्याचाही इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

हे सुद्धा वाचा

‘विरोधकांच्या छातीत धडकी भरली’

“दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. आमचं काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरलेली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीचा एका विजयाने ते एवढे हुरळून गेले आहेत की त्यांना वाटतं की आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल. पण त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला हे त्यांना दिसत नाही. यापूर्वीदेखील बदलाचे वारे वाहून गेले असा अंदाज व्यक्त केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा महायुतीला विजय मिळेल आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

“आशीर्वाद यात्रेला सर्वसान्यांचा प्रचंड उत्सफुर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आम्हाला शिवेसना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर आज लोकांचे आशीर्वाद मिळत आहे. महायुतीच्या आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या आशीर्वाद यात्रेला महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. जनेतेदेखील प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. शेवटी जनता-जनर्दन, मुंबईकरांचा आशीर्वाद महायुतीबरोबर आहे. जनतेने आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद दिलेला आहे”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.