मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Nov 02, 2023 | 9:57 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी गेलेले कायदेतज्ज्ञ, मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रवी खरात, Tv9 मराठी, मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी गेलेले कायदेतज्ज्ञ, मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.  “मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यांचे आभार मानतो. त्यांच्या समाजाचंही आभार मानतो. शासनाच्या आवाहनाला मान देऊन उपोषण मागे घेतल्याबद्दल सकल मराठा समाजाचं अभिनंदन करतो. आमच्या शासनाच्या शिष्टमंडळासमोर जरांगे यांनी मुद्दे मांडले. न्यायामूर्ती मारोतराव गायकवाड आणि न्यायामूर्ती सुनील शुक्रे यांचंही अभिनंदन करतो. इतर कायदे तज्ज्ञही या शिष्टमंडळात होते. आमचे मंत्रिमंडळातील सहकारीही होते”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“मी जरांगेंशी परवा चर्चा केली होती. त्यांचे काही मुद्दे होते. त्यांनी एवढंच सांगितलं की, सरकार टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडत आहेत. आपण मराठवाड्यात आरक्षण देत आहोत. कुणबी दाखला देण्याचं यश शिंदे समितीला मिळालं हे त्यांना सांगितलं. १३ हजार नोंदी सापडल्या ही मोठी कामगिरी आहे. शिंदे समितीने दिवसरात्र काम केलं. आणखी कुणबी नोंदी सापडणार आहेत. त्यामुळे खात्री पटल्याने शिंदे समितीने वेळ वाढवून मागितली”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘ही इतिहासातील पहिली घटना’

“निर्णय घेणार तो टिकणारा पाहिजे. त्याला चॅलेंज होऊ नये असं मी त्यांना सांगितलं. सरकार बद्दल ही जनतेते कोणताही संभ्रम राहू नये त्या पद्धतीने चर्चा केली पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. माझी चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू तिकडे गेलो होते, बच्चू कडू यांच्याशी माझा संवाद झाला. चर्चेतून प्रश्न सुटू शकतो. मार्ग निघतो यावर आमचा विश्वास होता. म्हणून कायदेतज्ज्ञ आणि मंत्र्यांना पाठवलं. उपोषणस्थळी कायदे तज्ज्ञ जाण्याची ही इतिहासातील पहिली घटना असेल. गायकवाड यांना या विषयाची खडा न् खडा माहिती होती. त्यामुळे ते गेले. निवृत्त न्यायाधीशांशी बोलल्या नंतर त्यांना खात्री पटली असेल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.