मुंबई : गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर की पळापळ करून राज्यात नवी महाविकास आघाडी तयार झाली. हे सरकार पाच वर्ष टिकणार असे हे नेते रोज सांगत होते. मात्र एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडामुळे अडीच वर्षातच हे सरकार अडीच वर्षातच ठाकरे सरकार कोसळलं. (Uddhav Thackeray) आता राज्यात नव शिंदे-भाजप (Shinde Bjp Alliance) सरकार स्थापन झालं. मात्र याही सरकारला स्थापन होऊन आठवडाभर पूर्ण होत आला तोपर्यंतच आता वादाची नवी ठिणगी पडली आणि यावेळी त्याला कारण ठरलेत भाजप नेते किरीट सोमय्या, कारण किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयात पोहोचले शुभेच्छा ही दिल्या मात्र शिंदे सोबतचा एक फोटो ट्विट करत त्यांनी त्या फोटोला जे कॅप्शन दिले, त्यावरून आता शिवसेना आमदार चिडले आहेत.
मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की “मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केले.” अशा आशयाचे ट्विट करत किरीट सोमय्या यांनी एकनाथ शिंदे आणि सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. याच ट्वीटवर आता शिवसेना नेत्यांनी आक्षेप घेतला आहे आणि थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे हाही वाद आता चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. सोमय्यांचं हे वक्तव्य चुकीचे आहे, याबाबत पक्षश्रेष्टी चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी दिली आहे.
शिवसेना नेत्यांचं बंड झाल्यापासून एकाही शिवसेना नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. तर काही नेते हे आदित्य ठाकरे यांनाही प्रत्युत्तर देताना दिसून आले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कधीही टिकेचा शब्द शिवसेना आमदारांकडून आला नाही. आता सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर या शब्दात टीका केल्यावर बंडखोर शिवसेना आमदारांना ही टीका चांगलीच झोबलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमीच उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांना टार्गेट करत असतात. मात्र त्यांची ही टीका आता पहिल्यासरखी घेतली जाणार नाही, हे शिवसेना आमदारांनी लगेच दाखवून दिलं आहे, एवढं मात्र नक्की.