मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jul 21, 2023 | 10:29 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुले अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी काही मोठा निर्णय होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री अचानक दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. विधी मंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. तर रायगडच्या खालापूर येथे इर्साळवाडी गावावर दरड कोसळली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. पण त्यांच्या या दौऱ्यामागचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय.

एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या निमित्ताने एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा आणखी वाढला आहे. कारण अजित पवार सत्तेत आल्याने राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या नेत्यांसाठी खातेवाटप देखील झालं आहे. या खातेवाटपात शिंदे गटातील मंत्र्यांचीदेखील खाती देण्यात आली आहेत. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप पार पडलेला नाही.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा चर्चेचा मुद्दा आहे. विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर अंतिम निर्णय होतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री विमानतळाच्या दिशेला रवाना झाल्यानंतर अजित पवार यांची नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत अर्धा तास बैठक झाल्याची माहिती समोर आली होती.