मुंबई: राज्यात तब्बल दीड वर्षानंतर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. विद्यार्थी हे आपले आधारस्तंभ आहेत. त्यांची काळजी घ्या, असं सांगतानाच एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होणार नाहीत असा निर्धार करा, असं आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि पालकांना केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. अत्यंत मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. संबोधनाच्या सुरुवातीलाच त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांन पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही या निर्धारानं आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मी नेहमी कोरोनाच्या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो. आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना शाळेत जाऊ कधी असा प्रश्न पडला होता. ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ याची सुरुवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’पासून सुरुवात झाली. मुलं ही फुलांसारखी असतात. आज शाळेचं दार उघडलं आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचं दार उघडलं आहे. माझी शिक्षक आणि पालकांना विनंती आहे, आपल्या पाल्याची जबाबदारी व्यवस्थितपणे घ्या आम्ही सोबत आहोत. एखाद्या शिक्षकाची तब्येत बिघडली असल्यास त्यांनी टेस्ट करुन घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यास तातडीनं उपचार करुन घ्यावेत. प्रत्येक सीझनमध्ये आजार येतात. आता ऑक्टोबर हीट येईल. त्यामुळे कोरोना तर नाही ना याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
रवींद्रनाथ टागोरांची शाळा शांतीनिकेतन द्वारे शिक्षण सुरु केली होती. निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी ही शाळा उघडी केली होती. शिक्षणाची जागा बंदिस्त असता कामा नये. शाळेची दारं खिडक्या उघड्या ठेवा. हसतीखेळती मुलं तशीच खेळती हवा हवीच. शाळेत निर्जंतुवणूकीकरण करा. मुलांमध्ये अंतर ठेवा. त्यांना मास्क लावायला सांगा, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
आमचे विद्यार्थी आमची जबाबदारी आहेत, ह्या प्रतिज्ञेसह विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत. शालेय शिक्षण विभाग व @CMOMaharashtra यांच्या #माझे_विद्यार्थी_माझी_जबाबदारी या कार्यक्रमात सामील व्हा. https://t.co/ac0o5redbT
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 4, 2021
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ओल्या मराठवाड्यात गेलेच नाहीत, अजित पवार म्हणतात, सगळं कळतंच असं नाही
राजू शेट्टी म्हणालेत, दिवाळी गोड होऊ देणार नाही, आता अजित पवारांनी हिशेबच सांगितला
शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते, त्यांना जशास तसे उत्तर द्या; भाजपच्या ‘सीएम’चं ‘खट्टर’नाक विधान
(cm uddhav thackeray addressed students after school reopening)