मुंबई: मुंबईत अनेक लोक पोटापाण्यासाठी येतात आणि राहतात. पण असं हक्काचं घर मिळाल्याने ते विकून सोडून जाऊ नका. तुम्ही आजवर जो संघर्ष केला. तो कायम लक्षात ठेवा. हक्काचं घर विकून मुंबईबाहेर (mumbai) जाऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं. गोरेगावच्या पत्रावाला चाळीच्या विकास कामाचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. अनेकांना माहित आहे गेल्या अनेक वर्ष त्याचं दळण दळलं जात होतं. पण प्रश्न सुटत नव्हता. मघाशी उल्लेख झाला. अनेकांनी या चाळीच्या विकासासाठी आंदोलन केले. आजचा हा क्षण पाहायला अनेकजण हयातही नाही. गेल्यावर्षी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मला भेटायला आले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही (jitendra awhad) उपस्थित होते. त्यानंतर या प्रश्न मार्गी लागला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सुभाष देसाईंनी या कामासाठी पिच्छा पुरवला होता. प्रत्येक भेटीत पत्रावाला चाळीबाबत ते बोलायचे. कामं मोठी आहेत. अडचणी डोंगराएवढ्या आहेत. पण एकदा का अडचणी सोडवायच्या म्हटलं तर त्या सोडवल्या जाऊ शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, हा प्रकल्प किती जुना आहे, त्यात काय अडचणी आल्या याचा पाढा वाचणार नाही. चिकाटी असेल तर सर्व काही होतं. जिद्द असली की सर्व काही होतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या स्वप्नाची वाट पाहत होतो. ते आज सुरू होत आहे. लवकरच तुम्हाला घरं मिळतील. घरं मिळवण्यासाठी जो संघर्ष केला ते लक्षात ठेवा. विसरू नका. अनेक लोक घराची वाट पाहून निघून गेले. त्यांची आठवण ठेवा. हे घर विकून मुंबई बाहेर जाऊ नका. तुम्ही जिद्दीने संघर्ष केला आणि तो जिंकला, असं सांगतानाच घरं मिळाल्यावर निदान आम्हाला चहा प्यायला तुमच्या घरी बोलवा, असं मिष्किल उद्गार त्यांनी काढले. त्यावेळी एकच खसखस पिकली.
VIDEO : पत्राचाळ पुनर्विकासाच्या प्रलंबित बांधकामाचा शुभारंभ, उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती#UddhavThackeray #Online #Shivsena #MVA_Sarkar pic.twitter.com/R9CVVVKfUh
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2022
संबंधित बातम्या:
एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख
एसटी विलीनीकरणाचा मुद्दा धोरणात्मक, निर्णयाला वेळ लागणार-अनिल परब
Nashik | बिबट्याशी दिली झुंज; जीवाची पर्वा न करता डोळ्यात माती टाकून वाचवले प्राण !