सरकार पडलं नाही, पण राजकीय हल्ले परतवत आघाडीने एक वर्षे पूर्ण केलं; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

| Updated on: Dec 20, 2020 | 2:13 PM

नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. (CM Uddhav Thackeray addressing the State to give a update on the situation of Coronavirus)

सरकार पडलं नाही, पण राजकीय हल्ले परतवत आघाडीने एक वर्षे पूर्ण केलं; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
Follow us on

मुंबई: गेल्या 28 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केले आहे. हे सरकार आज पडेल, उद्या पडेल म्हणून अनेकजण डोळे लावून बसले होते. पण सरकार पडलं नाही, विकास करत आणि राजकीय हल्ले परतवत या सरकारने एक वर्षे पूर्ण केलं आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला नाव न लगावला. (CM Uddhav Thackeray addressing the State to give a update on the situation of Coronavirus)

नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यामुळे ते जनतेला काय आवाहन करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावरून राज्यातील जनतेला सावध करतानाच भाजपला चिमटेही काढले. गेल्या 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. हे सरकार आज पडेल उद्या पडेल म्हणून काही लोक डोळे लावून बसले होते. पण सरकार पडलं नाही. उलट गेल्या शंभर वर्षात परिस्थिती आली नव्हती अशा परिस्थितीचा सामना करत, विकास कामे करत आणि राजकीय हल्ले परतवत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केलं, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

तुमच्या विश्वासाला तडा बसू देणार नाही

मी जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा तुमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखंच बोलतो. ते तुम्हालाही माहीत आहे. मी या खूर्चीवर बसलो आहे. त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा बसू देणार नाही. विकासाला विलंब लागला तरी चालेल. पण तो दीर्घकालीन असावा, तात्कालिक विकास नको. जे काही करू ते भावी पिढीसमोर ठेवूनच करू. चांगलंच करू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

तुम्हाला श्रेय देतो, कारशेडचा प्रश्न एकत्र बसून सोडवू

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणतीही खळखळ न करता बुलेटला जागा दिली. पण आम्हाला जागा देताना मात्र खळखळ केली जाते. केंद्र सरकार आपल्याविरोधात कोर्टात गेलं आहे. कांजूरची जागा त्यांची असल्याचा दावा केला आहे. खरं तर केंद्र आणि राज्याने हा प्रश्न एकत्र बसून सोडवला पाहिजे. तुझं आणि माझं करू नये, असं सांगतानाच हा कद्रूपणा सोडा. मी तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. विरोधी पक्षाने सोबत यावं. आपण एकत्र बसून हा प्रश्न सोडवू. माझ्या इगोचा प्रश्नच येत नाही. पण तुमच्याही इगोचा प्रश्न असता कामा नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

होय मी अहंकारी आहे, पण महाराष्ट्रासाठी

मी अहंकारी असल्याचं काही लोक म्हणत आहेत. होय, मी अहंकारी आहे. पण माझ्या महाराष्ट्रासाठी मी अहंकारी आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अहंकारी आहे, असं सांगतानाच कांजूरच्या जागेवर अधिकार सांगत केंद्र सरकार कोर्टात गेलं. हा विकास आहे की अहंकार?; असा टोलाही त्यांनी लगावला.

कांजूरचा प्रकल्प शंभर वर्षांचा विचार करूनच

आरेच्या टोकावर कास्टिंग यार्ड आहे. तिथे आपण पार्किंगची लाईन करत आहोत. आरेत आपण पर्यावरण वाचवलं आहे. शहरात जंगल असलेलं ते एकमेव ठिकाण आहे. कांजूरमार्गमध्ये 40 हेक्टर जागा आहे. तर आरेत 25 हेक्टर जागा आहे. कांजूरमार्गचा भूभाग गवताळ आणि ओसाड आहे. आरेत केवळ मेट्रो तीनचे कारशेड होणार होतं. तर कांजूरमध्ये मेट्रो 3, 4 आणि 6 च्या लाईनची कारशेड होणार आहे. आरेत केवळ एकाच लाईनसाठी कारशेड होणार होती. 4 आणि 6 साठी काय करणार होते? याचा विचारही करण्यात आलेला नव्हता. कांजूरला मात्र तिन्ही लाईनच्या कारशेडचं एकत्र काम होणार आहे. कांजूरला 100 वर्षाचा विचार करून आपण प्रकल्प करणार आहोत. तात्पुरता विचार करून कोणतीही गोष्ट करत नाही. पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून निर्णय घेत आहे, त्यामुळे काय योग्य आणि काय नाही हे आता तुम्हीच ठरवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. मेट्रोच्या 14 व्या लाईनचा अंबरनाथ आणि बदलापूरच्या लोकांनाही फायदा होणार आहे. त्यांना एखादं स्टेशन बदलून थेट कुलाबा किंवा अंधेरीला येता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अति घाईने विकास होत नाही

घाईघाईने काही केलं म्हणजे विकास होतोच असं नाही. अतिघाई संकटात नेई. विकासकामे मार्गी लावताना अतिघाई करण्यात उपयोग नाही, असं सांगतानाच मला तात्कालीक विकास नकोय. तर दीर्घकालीन विकास हवा आहे, असं त्यांनी सांगितलं. (CM Uddhav Thackeray addressing the State to give a update on the situation of Coronavirus)

इलाजापेक्षा काळजी घ्या

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोना संकटावरून पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला. युरोप आणि इंग्लंडमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. कोरोनाची चौथी लाट आली आहे. त्यामुळे सावध राहा. राज्यात कोरोनावर नियंत्रण आहे. 70 टक्के लोक मास्क लावून फिरताना दिसतात, ही नक्कीच चांगली बाब आहे. पण अजूनही 30 टक्के लोक मास्क लावत नाहीत. बंधने पाळत नाहीत. तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका, आपल्या आप्तेष्टांच्या जीवाशी खेळू नका. आनंदाला थोडे दिवस बंधन घाला. इलाजापेक्षा काळजी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरा. मास्कला शस्त्र समजा, असंही ते म्हणाले.

लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावू शकतो

राज्यात कोरोनाचं संकट येऊ नये म्हणून मला अनेकांनी लॉकडाऊन करण्याच्या सूचना केल्या. काही लोकांनी नाईट कर्फ्यू लावण्याच्याही सूचना दिल्या. हे मी करू शकतो. पण मला करायचं नाही. काय करायचं आणि काय नाही हे आपल्याला कळतं. ती वेळ आणू द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे, त्यामुळे तुम्हीच स्वत:वर काही बंधने लादून घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं. (CM Uddhav Thackeray addressing the State to give a update on the situation of Coronavirus)

 

संबंधित बातम्या:

Uddhav Thackeray | होय, मुंबईबाबत मी अहंकारी : उद्धव ठाकरे

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

सांगलीत शिवसेनेचा धक्का, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप नेत्यांना शिवबंधन

(CM Uddhav Thackeray addressing the State to give a update on the situation of Coronavirus)