मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख झाल्याने काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला आहे. मात्र, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले आहे. संभाजीनगर असा ट्विटर हँडलमध्ये उल्लेख केला तर त्यात नवीन काय आहे? असा सवाल करतानाच औरंगजेब हा सेक्युलर नव्हता. आघाडीच्या अजेंड्यात सेक्युलर हा शब्द असून त्यात औरंगजेब बसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला फटकारले आहे. (cm uddhav thackeray slams congress over aurangabad rename issue)
वसंत गीते आणि सुनील बागुल या नाशिकमधील नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला फटकारले. राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे काँग्रेसला फटकारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
तुमच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांना प्रसारमाध्यमांनी केला. त्यावर त्यात नवीन काय केलं? जे वर्षानुवर्षे बोलतोय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो उल्लेख केला, तेच ट्विटरवर लिहिलंय, असं सांगतानाच औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. आमच्या अजेंड्यात सेक्युलर शब्द आहे. त्यात औरंगजेब बसत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
भेटीने राजकीय परिस्थितीवर परिणाम नाही
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत. एखाद्या भेटीने राजकीय परिस्थितीवर परिणाम होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यात मोठे प्रकल्प येत आहेत. त्यात रस्त्याचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात काही स्पीड ब्रेकर आहेत. त्यावर गडकरींशी चर्चा केली असून हे स्पीड ब्रेकर लवकरच दूर होतील, असंही ते म्हणाले.
नाशिकवर भगवा फडकणारच
गीते आणि बागुल यांच्या पक्षप्रवेशावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही सर्व मंडळी आमचीच आहेत. तेव्हाही होती आणि आताही आहे. मधल्या काळात त्यांनी वेगळा मार्ग पत्करला होता. आता अनुभव समृद्ध करून ते शिवसेनेत आले आहेत, असं सांगतानाच नाशिक महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात फाटाफूट झाली होती. पण आता पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनं आम्ही नाशिक पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवूच, असं ठाकरे म्हणाले. केवळ निवडणूक आले म्हणून गीते, बागूल यांनी पक्षप्रवेश केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (cm uddhav thackeray slams congress over aurangabad rename issue)
VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7:30 PM | 7 January 2021https://t.co/fvkh4MICtg#Top9 #Top9News #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत
स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेचा मास्टर प्लॅन तयार, वसंत गीते, सुनील बागुल समीकरणं बदलणार?
बागुल, गीतेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेची भगवी शाल उबदार, तेजस्वी होणार? संजय राऊत म्हणाले…
(cm uddhav thackeray slams congress over aurangabad rename issue)