मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणसाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

| Updated on: Jul 25, 2021 | 10:17 AM

काल महाडमधील तळीये गावची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. (CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणसाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई: काल महाडमधील तळीये गावची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून चिपळूणकडे रवाना झाले आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (CM Uddhav Thackeray went to inspect flood situation in Chiplun)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना झाले आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे 11 वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी 12.20 वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी 2.40 वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होतील.

राणे, फडणवीस, दरेकर, आठवले कोकणात

दरम्यान, आज केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोकण दौऱ्यावर आले असून त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. हे तिन्ही नेते तळीये येथे जाणार असून दुर्घटनाग्रस्तांचं सांत्वन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत, असं ट्विट नारायण राणे यांनी दौऱ्याला निघण्यापूर्वी केलं आहे. तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले हे सुद्धा आज तळीये येथे जाऊन पाहणी करणार आहेत.

राणे-फडणवीसांचा दौरा कसा असणार?

सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईवरुन महाडकडे रवाना
दुपारी 12 वाजता रायगडवरुन खेडकडे प्रयाण
दुपारी 1 वाजता खेडवरुन चिपळूणकडे प्रयाण व पाहणी (CM Uddhav Thackeray went to inspect flood situation in Chiplun)

 

संबंधित बातम्या:

VIDEO | खुर्चीवर बसा, आपल्या ‘रखुमाई’चंही न ऐकता मुख्यमंत्री ठाकरे विठ्ठलासमोर जमिनीवर बसले

पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय, फडणवीस-दरेकर साथीला; नारायण राणेंचं ट्विट

“इतर राज्यांसाठी मदत, महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही, बॉलिवूडकरांनो संवेदनशील व्हा, मदतकार्याला हातभार लावा”

(CM Uddhav Thackeray went to inspect flood situation in Chiplun)