Colaba Assembly constituency : कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. मुंबईतील हा महत्त्वाचा एक मतदारसंघ आहे. २००८ मध्ये केलल्या मतदारसंघांच्या रचनेनंतर त्याची निर्मिती झाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा पराभव केला होता. राहुल नार्वेकर यांच्या आधी भाजपचे राज पुरोहित येथून आमदार होते.
यंदा राहुल नार्वेकर यांना या मतदारसंघातून पुन्हा संधी दिल्याने राज पुरोहित नाराज असल्याची चर्चा होती. राज पुरोहित यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी राज पुरोहित यांची नाराजी दूर केल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी रोखण्यात यश आले आहे.
राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि संभ्रम दूर केला. राहुल नार्वेकर म्हणाले की, ”ही निवडणूक राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांची आहे. आम्ही एकत्र येऊन ५० हजार मतांच्या फरकाने विजयी होऊ. भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न आहे.”
कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते राज पुरोहित यांचा आधीपासून चांगला दबदबा राहिलाय. २००९ मध्ये राज पुरोहित यांचा येथून पराभव झाला होता. पण २०१४ मध्ये त्यांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ मध्ये राज पुरोहित यांचा पत्ता कापत भाजपने राहुल नार्वेकर यांना येथून उमेदवारी दिली होती. ज्यामध्ये ते विजयी झाले होते. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून विद्यामान आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मतं |
राहुल नार्वेकर | भाजप | 57,420 |
भाई जगताप | काँग्रेस | 41,225 |
जितेंद्र रामचंद्र कांबळे | इतर | 3,011 |
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मतं |
राज के. पुरोहित | भाजपा | 52,608 |
पांडुरंग गणपत सकपाळ | शिवसेना | 28,821 |
ऍनी शेखर | काँग्रेस | 20,410 |
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मतं |
अन्नि शेखर | काँग्रेस | 39,779 |
राज के. पुरोहित | भाजप | 31,722 |
अरविंद ज्ञानेश्वर गवडे | मनसे | 22,756 |