दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी : अनेक रेल्वे, विमानांना बसला फटका

| Updated on: Jan 07, 2023 | 12:20 PM

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेच्या निर्देशांक कमी होतोय. मुंबईत थंडी वाढल्यामुळे धुके वाढली आहे.

दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी : अनेक रेल्वे, विमानांना बसला फटका
mumbai fog
Follow us on

नवी दिल्ली, मुंबई :  देशभरात थंडीचा प्रकोप (cold wave) सुरु आहे. दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे. राजधानी काही ठिकाणी तापमान १.८ अंशांपर्यंत घसरलंय. धुके, कमी दृश्यमानता व खराब हवामानाचा फटका अनेक ठिकाणी रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीला बसलाय. दिल्लीत हाडे गोठवून टाकणारी थंडी जाणवतेय.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीपासून काहीसा दिलासा रविवारपासून मिळणार आहे. नवी दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 18 अंश तर किमान तापमान 5 अंश राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर रविवारपासून तापमानात आणखी वाढ होणार आहे. 12 जानेवारीपर्यंत कमाल तापमान 22 अंशांपर्यंत तर किमान तापमान 9 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत दाट धुके कायम राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत हवेची गुणवत्ता खालवली

धुक्यामुळे दिल्लीत ३० विमाने तर २६ रेल्वेगाड्या उशिराने धावत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेच्या निर्देशांक कमी होतोय. मुंबईत थंडी वाढल्यामुळे धुके वाढली आहे. मुंबईत अनेक भागांत हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर आहे. हवेची गुणवत्ता खालवल्यामुळे ज्येष्ठांना व रुग्णांना त्राय होऊ लागलाय.

राजस्थानमध्ये उणे तापमान

राजस्थानमध्ये थंडीचा प्रकोप सुरु आहे. राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये उणे तापमान सुरु आहे. यामुळे शाळांनाही सुटी दिली गेली आहे. सकाळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.