मुंबईकर सध्या थंडीचा आनंद लुटत आहेत. रविवारी रात्रीपासून थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. मुंबईत तापमान 13.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, गेल्या 9 वर्षांतील डिसेंबरमधील हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे मुंबईत पुढील आणखी दोन ते तीन दिवस थंडी कायम राहणार असल्याचं हवामाना खात्याने म्हटलंय. यावेळी रात्रीचे तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली होती. ज्यामुळे लोकांना उष्णतेचा सामना करावा लागला. मात्र आता मुंबईकर थंडीचा आनंद लुटत आहेत.
शनिवारपासून मुंबईतील तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. शनिवारी रात्री किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. रविवारी रात्री तापमान 13.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. याआधी 24 डिसेंबर 2015 रोजी मुंबईचे किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. 20 डिसेंबर 1949 रोजी किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस होते, जो आजपर्यंतचा विक्रम आहे. मुंबईत रात्री तसेच दिवसाच्या तापमानात किंचित घट पाहायला मिळत आहे.
Right now: Smoke, Temperature: 26.99C, Humidity: 50, Wind: From W at 2.06KPH, Updated: 7:18PM #Mumbai #Weather
— WeatherMumbai (@WeatherMumbai) December 10, 2024
डिसेंबरमध्ये दमटपणामुळे मुंबईकरांना घाम फुटला होता. त्यामुळे मुंबईकरांना थंडीचा आनंद मिळत नव्हता. 8 डिसेंबरनंतर मुंबई शहर, उपनगर आणि परिसरात कमाल आणि किमान दोन्ही तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर आता ही घट पाहायला मिळत आहे.
Rainfall Warning : 11th December 2024
वर्षा की चेतावनी : 11th दिसंबर 2024#rainfallwarning #IMDWeatherUpdate #stayalert #staysafe #Tamilnadu #andhrapradesh@moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts @tnsdma @APSDMA pic.twitter.com/IwEvdvxjHh— India Meteorological Department (@Indiametdept) December 10, 2024
मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या सुधारत आहे. आजचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) मुंबईसाठी 104 वर आहे जो मध्यम पातळी दर्शवतो. ज्यांना अस्थमा किंवा इतर श्वासोच्छवासाच्या समस्या असतील अशा लहान मुलांनी आणि प्रौढ व्यक्तींनी घरातच राहिले पाहिजे.