कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या; जयंत पाटलांची मोदींकडे पुन्हा मागणी

| Updated on: May 09, 2021 | 1:16 PM

कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. (Confer Bharat Ratna on Karmaveer Patil: jayant patil)

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या; जयंत पाटलांची मोदींकडे पुन्हा मागणी
jayant patil
Follow us on

मुंबई: कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. आज भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने पाटील यांनी मोदींना पुन्हा या मागणीची आठवण करून दिली आहे. (Confer Bharat Ratna on Karmaveer Patil: jayant patil)

जयंत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. सोबत त्यांनी तीन वर्षांपूर्वी म्हणजे 9 मे 2018 रोजी मोदींना लिहिलेल्या पत्राची प्रत जोडली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांना शिक्षणाकडे वळवले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या शिक्षणासाठी समर्पित केले म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी तीन वर्षापूर्वी केली होती. आज पुन्हा एकदा मोदींकडे ही मागणी करत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष आजही उभा

माझ्या दाढीत जितके केस आहेत तितके बहुजन शिक्षित करेन असा संकल्पच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अखंड ज्ञानदानाचा कार्यक्रम हाती घेतला. रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष आजही तसाच उभा आहे आणि गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देत आहे, याकडेही पाटील यांनी मोदींचं लक्ष वेधलं आहे.

साताऱ्यात समूह विद्यापीठ

दरम्यान, ज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने समूह विद्यापीठ निर्माण करणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियाना अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार ज्या महाविद्यालयांकडे पुरेशा शैक्षणिक, भौतिक तसेच तांत्रिक, पायाभूत सोयीसुविधा आहेत; अशा 3 ते 5 विद्यमान महाविद्यालयांची संसाधने एकत्रित करुन केली जाणार आहेत. त्यानंतर समूह विद्यापीठाची स्थापना केली जाईल. समूह विद्यापीठाच्या गुणवत्तेचा दर्जा राखण्यात समर्थ असलेल्या महाविद्यालयांचा समावेश यामध्ये करण्यात येईल. (Confer Bharat Ratna on Karmaveer Patil: jayant patil)

 

संबंधित बातम्या:

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत, तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र

LIVE | पुण्यात अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा,दोन आरोपीना अटक

Maharashtra Coronavirus LIVE Update : भिवंडी पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद

(Confer Bharat Ratna on Karmaveer Patil: jayant patil)