मुंबई : सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नुकताच याबाबत काँग्रेसच्या स्ट्रॅटजी कमिटी सचिवांकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसची मदार अभिनेत्यांवर असल्याचे बोलले जात आहे. (Congress depends on actors, celebrities for Mumbai mayoral post, Riteish Deshmukh, Sonu Sood, Milind Soman in raceय़)
मुंबई काँग्रेस स्ट्रॅटेजी कमिटी सचिव गणेश कुमार यादव यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात मुंबईच्या महापौरपदासाठी काही नावांचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात अभिनेता रितेश देशमुख, अभिनेता सोनू सूद, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
या स्ट्रॅटेजी कमिटीत एच. के. पाटील, अशोक चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, विरोधी पक्ष नेते रवी राजा हे सर्व नेते आहेत. त्यामुळे आता या कमिटीचा हा अहवाल चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात या नेत्यांच्या कमिटीसमोर हा रिपोर्ट विचारार्थ ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे.
मात्र या स्ट्रॅटेजी कमिटीच्या अहवालात महापौरपदासाठी सेलिब्रेटीच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने आता काँग्रेसची मदार अभिनेत्यांवर आहे का, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी नाही. मात्र, भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याने भाजपने बीएमसीत महापौर पदावर दावा केला नव्हता. शिवसेनेला मुंबईच्या महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपनं शिवसेनेला मदत केली होती. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं महापौरपद कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला भाजपने आव्हान दिल्यास इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र त्यानंतर भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.
इतर बातम्या
‘महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं रोखलं तरी दहिहंडी होणार’, भाजप आमदाराचं थेट आव्हान
Dahi Handi : जीव वाचवण्यासाठी सण-वार काही काळ बाजूला ठेवू, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन
(Congress depends on actors, celebrities for Mumbai mayoral post, Riteish Deshmukh, Sonu Sood, Milind Soman in raceय़)