Bhai Jagtap | पेट्रोल, गॅस दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक, ‘स्मृती इराणी कुठे आहेत ?’ भाई जगताप यांचा सवाल

| Updated on: Nov 14, 2021 | 4:58 PM

गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतोय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पदन शुल्कात कपात केली असली तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जातेय. या पार्श्वभूमीवर भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांना घेऊन मुंबई काँग्रेसने पदयात्रेचे आयोन केले होते. या यात्रेदरम्यान भाई जगताप बोलत होते.

Bhai Jagtap | पेट्रोल, गॅस दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक, स्मृती इराणी कुठे आहेत ? भाई जगताप यांचा सवाल
smriti iraniand bhai jagtap
Follow us on

मुंबई : पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात तसेच मोदी सरकारच्या नीतीविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत, असा रोखठोक सवाल काँग्रेसचे नेते तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतोय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पदन शुल्कात कपात केली असली तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जातेय. या पार्श्वभूमीवर भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांना घेऊन मुंबई काँग्रेसने पदयात्रेचे आयोन केले होते. या यात्रेदरम्यान भाई जगताप बोलत होते.

स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही

“मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला गेलाय, असं जरी सांगितलं जात असलं तरी याला पार्श्वभूमी आहे. महागाई, वाढत्या बेरोजगारीविरोधातील हे शक्तिप्रदर्शन आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत,” असे भाई गजताप म्हणाले.

राहुल गांधींची शिवाजी पार्कवर जाहीर सभा

यावेळी वाढती बेरोजगारी आणि महागाई पदयात्रेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनीदेखील भाग घेतला होता. आगामी काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “केंद्र सरकार, महागाई, बेरोजगारीविरोधात हे शक्तिप्रदर्शन आहे. मुंबईत आज याची सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यात राहुल गांधी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेऊन मोदी सरकारच्या नीतीविरोधात बोलणार आहेत. त्याची साक्षीदार महाराष्ट्र आणि मुंबईची जनता राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

भव्य पदयात्रा जनजागरण अभियान

दरम्यान, देशामध्ये वाढती बेरोजगारी व महागाईविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा व जनजागरण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे केंद्रातील माजी मंत्री, काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व मंत्री, काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी-माजी आमदार खासदार, नगरसेवक, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान म्हणजेच राजगृह ते दादर येतील चैत्यभूमी असा या पदयात्रेचा मार्ग होता.

इतर बातम्या :

शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल, कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

VIDEO: दंगल भडकावण्याची ताकद रझा अकादमीत कधीच नव्हती; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?