देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेरचं आंदोलन काँग्रेसने थांबवलं, भाजपचा खरा चेहरा समोर आला; नाना पटोलेंचा घणाघात

| Updated on: Feb 14, 2022 | 12:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण हे आंदोलन पोलिसांनी मध्येच अडवलं.

देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेरचं आंदोलन काँग्रेसने थांबवलं, भाजपचा खरा चेहरा समोर आला; नाना पटोलेंचा घणाघात
नाना पटोले
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण हे आंदोलन पोलिसांनी मध्येच अडवलं. यावेळी पोलिसांनी हे आंदोलन न करण्याची विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांना केली. पटोले यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने आहे त्या ठिकाणीच रस्त्यातच आंदोलन सुरू केलं. बराच वेळ आंदोलन केल्यानंतर अखेर हे आंदोलन थांबवत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं. मात्र, आजचं आंदोलन थांबलं असलं तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने सागर बंगल्यावरील आंदोलन थांबवलं असलं तरी भाजपच्या कार्यालयांवर होणारं आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही पटोले यांनी आज स्पष्ट केलं.

भाजपच्या आसामच्या मुख्यमंत्र्याने महिलांचा अवमान केला. मोदींनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याचाच आम्ही निषेध करत आहोत. भाजपने त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना रस्त्यावर उतरलं. मुंबईकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं. आम्ही तत्त्वाची लढाई लढत आहोत. आम्ही हे कदापी सहन करणार नाही. आजचं आंदोलन आम्ही थांबवलं आहे. पण भाजप खासदारांच्या घरासमोरी आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

मुंबईकरांची अडचण होऊ नये

कधी आंदोलन करू हे आम्ही ठरवू. तुम्हाला कळवलं जाईल. पण मोदी माफी मागत नाही. आसामच्या मुख्यमंत्र्याने महिलांचा अपमान केला. आईचा अपमान केला. ते जोपर्यंत माफी मागत नाही. तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. मुंबईकरांची अडचण होऊ नये म्हणूनच आम्ही आंदोलन थांबवत आहोत. हे देश विकणारे लोक आहेत, असा घणाघाती हल्लाही पटोले यांनी चढवला.

मोदींनी माफी मागावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. आता भाजपचे नेते या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाय. आम्ही फक्त मोदींनी माफी मागावी इतकेच म्हणतोय. दुसरीकडे प्रसाद लाडांसारखे अण्णा हजारांच्या वक्तव्याचा आधार घेत आहेत. मात्र, आम्ही अण्णा हजारेंवर काहीच बोलायचं नाही, असं ठरवल्याचे ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?

Video | देश विकणारे दिल्लीत, भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर; पटोलेंचा घणाघात, अण्णा हजारेंबाबत काय म्हणाले…?

Maharashtra News Live Update : मुंबईकरांच्या अडचणींचा विचार करुन आंदोलन थांबवतोय : नाना पटोले