मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे, मुंबईत पुन्हा 8000पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत, गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल 8 हजरा 82 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता आणखी वाढली आहे. काल मुंबईत (Mumbai) 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. तर शनिवारी मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे. आज मुंंबईत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट धिरोदात्तपणे हाताळलण्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra ) तिसऱ्या लाटेचे ढग गडत होत आहेत. रोज रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉनबाधित (Omicron) रुग्णदेखील वाढत असल्याचं समोर आलं आहे. या दुहेरी संकटामुळे आता राज्य लॉकडाऊनच्या (Lockdown) उंबरठ्यावर असल्याचं मंत्र्यांकडून म्हटलं जातंय.
गेल्या दहा दिवसातली मुंबईतील कोरोना आकडेवारी
3 जानेवारी 8082
2 जानेवारी 8063
1 जानेवारी -6347
31 डिसेंबर – 5428
30 डिसेंबर – 3671
29 डिसेंबर – 2510
28 डिसेंबर – 1377
27 डिसेंबर – 809
26 डिसेंबर – 922
25 डिसेंबर – 757
24 डिसेंबर – 683
धारावी पुन्हा अलर्टवर
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धारावीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. आता तिसऱ्या लाटेतही धारावी आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसत आहेत. आज धारावी आणि परिसरात 262 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. धारावीत आज कोरोनाचे 41 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दादरमध्ये 91 आणि माहीममध्ये सर्वाधिक 130 रुग्ण आढळले आहेत. म्हणजे या तीन्ही भागात आज दिवसभरात 262 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.