मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनसह कोरोना लसीकरणावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. मात्र, लसींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. अशावेळी मुंबई महापालिकेनं लसीकरणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ यानुसारच लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्यास सामाजिक दुरीकरणाची अंमलबजावणी कठीण आहे. त्यामुळे गर्दी न करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय. त्याचबरोबर आवश्यक त्या बाबींची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रांवर प्रवेश देण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. (Vaccination according to Covin app registration and appointment slot in Mumbai)
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. मात्र यानंतर अनेक ठिकाणी लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहे. या गर्दीमुळे सामाजिक दुरीकरण राखणं कठीण होत आहे. कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणारी काळजी घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांना सुलभतेने लसीकरण करता यावे, या उद्देशाने ज्या नागरिकांची ‘कोविन ॲप’ वर नोंदणी झालेली आहे, तसेच ज्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर जो मिळालेल्या ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ अनुसारच लसीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत.
‘कोविन-ॲप’ नोंदणी व प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ यानुसारच लसीकरण
लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्यास सामाजिक दुरीकरणाची अंमलबजावणी कठीण; त्यामुळे गर्दी न करण्याचे नागरिकांना आवाहन
आवश्यक त्या बाबींची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रांवर प्रवेश देण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश. pic.twitter.com/GnK8AStVwC
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 6, 2021
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण 16 जानेवारी 2021 पासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे 147 लसीकरण केंद्रे लशींच्या साठा उपलब्धतेनुसार कार्यरत आहेत.तथापि, गेले काही दिवस बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे सामाजिक दूरीकरणासारख्या कोविड प्रतिबंधात्मक बाबींची अंमलबजावणी योग्यरीत्या होणे कठीण होऊ शकते.
त्या पार्श्वभूमीवर आता केवळ ‘कोवीन ॲप’ किंवा ‘कोविन पोर्टल’ यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश आज सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, यामध्ये 2 अपवाद करण्यात आले आहेत. त्यात पहिला म्हणजे, वय वर्षे ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे ‘हार्ड कॉपी’ किंवा ‘सॉफ्ट कॉपी’ स्वरूपात सादर करावी. त्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.
तर दुसरी बाब म्हणजे आरोग्य कर्मचारी (Health Care Worker) किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी (Frontline worker) यांच्याबाबत ज्यांना कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे अशा व्यक्ती. तसेच आरोग्य कर्मचारी (Health Care Worker) किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी (Frontline worker) यांच्याबाबत लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा असल्यास अशा व्यक्तींच्या बाबत त्यांच्या कंपन्यांनी (Employer) अधिकृतपणे प्रमाणित केलेले निर्धारित नमुन्यातील पत्र याची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नागरिकांची हेळसांड थांबवण्यासाठी मुंबईमध्ये 3 नवे लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. त्यात,
1. माँसाहेब मिनाताई ठाकरे मॅटर्निटी होम, चुनाभट्टी
2. PWD कम्युनिटी हॉल, वांद्रे
3. MCMG पार्किंग, वर्ल्ड टॉवर, लोअर परळ
१८-४४ वयोगटातील नागरिकांसाठी ३ अतिरिक्त लसीकरण केंद्रं:
मासाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी
पीडब्ल्यूडी कम्युनिटी हॉल, वांद्रे पूर्व
बृहन्मुंबई महानगरपालिका पार्किंग, वर्ल्ड टॉवर, लोअर परेल#YoungAndVaccinated#MyBMCVaccinationUpdate https://t.co/DNmLsFadig
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 6, 2021
संबंधित बातम्या :
महाराष्ट्राची लसीकरणात आघाडी कायम, लसीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक
Vaccination according to Covin app registration and appointment slot in Mumbai