मुंबईत हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा; महापालिका कामाला लागली

| Updated on: Feb 20, 2021 | 12:55 PM

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. (coronavirus: bmc issues notice to hotels, marriage hall owner)

मुंबईत हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा; महापालिका कामाला लागली
Follow us on

मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, पब, रेस्टॉरन्ट आणि मंगलकार्यालयांना महापालिकांना नोटीसा बजावल्या आहेत. (coronavirus: bmc issues notice to hotels, marriage hall owner)

मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या पहाता पालिका अॅक्शन मोडवर आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने अंधेरी पश्चिमेतील 32 हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि मंगलकार्यालयाना नोटीसा बजावल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असून या नियमांचं काटेकोरपणे पालनं करा. तसेच होणारी गर्दी टाळा, अशा सूचनाच पालिकेने या हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि मंगलकार्यालयांना नोटीशी दिल्या आहेत.

तर अस्थापना सील करणार

महापालिकेने या रेस्टॉरंट, हॉटेल, पब आणि मंगलकार्यालयांना सज्जड दम दिला आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आस्थापन सील करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

चेंबूरमध्ये चार इमारती सील

मुंबईत काल 823 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर येथे कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणच्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 14 दिवसांसाठी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना घरातूनच काम करावं लागत असून जेवणही ऑनलाईन मागवावं लागत आहे. चेंबूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले असून परिसरात शुकशुकाट पसरला आहे.

धारावीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवले

एकीकडे मुंबईतील 4 वॉर्ड कोव्हिड हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत असताना मुंबईत सुरुवातीला कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी (Dharavi0, माहीम (Mahim) येथेही प्रशासनानं नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. नियंत्रणात आलेल्या धारावीत कोरोनानं पुन्हा हातपाय पसरु नये, या करिता प्रशासन दक्ष झालं आहे. दादर, धारावी, माहीम क्षेत्रातील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक, तसेच इतर कर्मचारी वर्गाची तपासणी करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकावर गुजरात तसेच इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग आणि कोव्हिडसदृश लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात येते. माहीममध्ये रुग्ण संख्या वाढल्या पालिकेने टेस्टिंग वाढवल्या आहेत. (coronavirus: bmc issues notice to hotels, marriage hall owner)

 

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह 

दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात, अमरावतीत चार रुग्ण, धोका वाढला 

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 6 हजार 112 नवे रुग्ण, 44 बाधितांचा मृत्यू

(coronavirus: bmc issues notice to hotels, marriage hall owner)