आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना लाट ओसरली, शहरात एकही कंटेन्मेंट झोन नाही

| Updated on: Aug 15, 2021 | 7:26 AM

Mumbai Coronavirus | मुंबईत आजघडीला एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. तसेच शनिवारी दिवसभरात महाराष्ट्रात पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण झाले. कालच्या एका दिवसात रात्री 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 9.52 लाख आणि मुंबईत 1.51 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली.

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना लाट ओसरली, शहरात एकही कंटेन्मेंट झोन नाही
Covid
Follow us on

मुंबई: काही महिन्यांपूर्वी राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरल्यामुळे मुंबईसह राज्यभरात रविवारपासून निर्बंध शिथील होतील. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आजघडीला एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. तसेच शनिवारी दिवसभरात महाराष्ट्रात पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण झाले. कालच्या एका दिवसात रात्री 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 9.52 लाख आणि मुंबईत 1.51 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली.

आजपासून मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार रविवारपासून सामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करता येईल. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असावेत, अशी अट घालण्यात आली आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल

संबंधित बातम्या:

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

Delta Variant : कोकण, उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ डेल्टा प्लसच्या रुग्णांची नोंद, राज्याची संख्या 66 वर, 5 जणांच्या मृत्यूनं चिंता कायम

मोठी बातमी: पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा पूर्ण