‘राज्यात तिसरी लाट अटळ, पण वेळ अनिश्चित; डेल्टा प्लस व्हेरीयंटचा तितकासा धोका नाही’

| Updated on: Jun 22, 2021 | 2:43 PM

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. 

राज्यात तिसरी लाट अटळ, पण वेळ अनिश्चित; डेल्टा प्लस व्हेरीयंटचा तितकासा धोका नाही
डेल्टा प्लस व्हेरिएंट
Follow us on

मुंबई: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. पण त्याचा निश्चित कालावधी आणि परिणामकारकता आताच सांगता येणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा (Delta Plus Variant) महाराष्ट्राला तितकासा धोका नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाण्याचे कारण नाही, असेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. (Maharashtra Health department on coronavirus third wave and Delta plus variant)

डेल्टा प्लस व्हेरीयंटचा अभ्यास करण्यासाठी 7 हजार नमुने हे एनआयव्ही आणि नॅशनल सेंटर फॉर सेल्सकडे (NCC ) पाठवण्यात आले आहेत. विषाणुंच्या जनुकीय रचनांचा अभ्यास करून राज्य सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरीयंट आढळलेल्या रुग्णात गंभीर लक्षणं नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. मात्र, त्याचा काळ आणि परिणामकारकता आताच सांगणं अशक्य असल्याचेही डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण

भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या व्हेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव AY.1 Variant असं देण्यात  आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळले आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची दिली. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंतेत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 11 हजारांनी घट, तीन महिन्यांनी आकडे 42 हजाराच्या घरात

आरोग्य यंत्रणेनं करुन दाखवलं, दिवसभरात 80 लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम

(Maharashtra Health department on coronavirus third wave and Delta plus variant)