मुंबईतल्या चार वॉर्डात कोरोना रुग्णसंख्या वाढली, इमारतींना नोटीसा; पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!

| Updated on: Feb 17, 2021 | 11:19 AM

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. (Covid-19: Mumbai Mayor warns of another lockdown)

मुंबईतल्या चार वॉर्डात कोरोना रुग्णसंख्या वाढली, इमारतींना नोटीसा; पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये!
Follow us on

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. मुंबईतल्या चार वॉर्डात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे सोसायट्यांमधील रुग्णसंख्या 98 टक्के वाढ झाल्याने महापालिकेने इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ शकतो, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. (Covid-19: Mumbai Mayor warns of another lockdown)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

कुठे किती रुग्णसंख्या?

चेंबूर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्यावाढीचा दर सर्वाधिक- 0.26% एवढी आहे. अंधेरी, जोगेश्वरीमध्ये 334, मुलुंडमध्ये 289, बोरिवलीत 402 आणि टिळक नगर, चेंबूरमध्ये 172 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण

इमारतींमध्ये 98 टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. एम पश्चिम वॉर्डात 550 इमारतींना नोटिसा पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या नोटिशीद्वारे रहिवााश्यांना कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुन्हा कडक नियम

मुंबईत कोरनोा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतील विविध भागात कोरोना नियमांची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाण, विवाह कार्यालये, बाजार, गर्दीची ठिकाणी आदी ठिकाणी कोरोना नियमांची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच इमारतीत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्याच्या आणि कमीत कमी लोकांना इमारतीत प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुलुंडमध्ये 170 इमारती सील

मुंबईत सध्या 810 सील इमारती आहेत. या पैकी मुलुंडच्या टी वॉर्डात 170 इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या 76 सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत. (Covid-19: Mumbai Mayor warns of another lockdown)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पुण्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग

Asthma | दम्याच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ! वाचा काय आहेत याची कारणे, लक्षणे व उपाय…

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना नव्या आजाराची लागण; मुंबईच्या रुग्णालयातील चिंताजनक प्रकार

(Covid-19: Mumbai Mayor warns of another lockdown)