माझ्या वाट्याला लागू नका म्हणालो होतो, गेलं ना मुख्यमंत्रीपद; उद्धव ठाकरेंना टोला

| Updated on: Mar 09, 2023 | 9:30 PM

पक्षाच्या वाटचालीचा इतिहास सांगताना त्यांनी हेही सांगितले की, गेल्या सतरा वर्षात इतर पक्षांनी जी आंदोलनं केली नाहीत ती आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माझ्या वाट्याला लागू नका म्हणालो होतो, गेलं ना मुख्यमंत्रीपद; उद्धव ठाकरेंना टोला
Follow us on

मुंबईः भाजपला सध्या देशात भरती आली असली तरी पुन्हा कधी तरी ओहोटी लागत असते हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे आज भाजपनेही हे लक्षात ठेवावे की आज जरी भरती असली तरी कधी ना कधी ओहोटी ही लागत असते असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. राज ठाकरे यांनी आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष स्थापनेपासून ते नाशिकच्या महानगरपालिकेवर सत्तेत येण्यापर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितला.

यावेळी त्यांनी नाशिकच्या महानगरपालिकेचा दाखला देत मतदार सांगतात की, गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या पक्षासारखी कामं झाली नाहीत मात्र ती तुम्ही पाच वर्षात कामं केली असं सांगतात. मात्र मतदान करताना या मतदारांचं आपल्याला काही समजत नाही असा टोला त्यांनी मतदारांना लगावला आहे.

YouTube video player

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविषयी बोलताना सांगितले की, राज्यातील राजकारणाविषयी बोलताना त्यांना उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

देशातील आणि राज्यातील राजकीय वादावर बोलताना त्यांनी भाजपसह टीका केलीच पण त्याच वेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

राजकारणात दिवस तेच राहत नाहीत ते बदलत असतात असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही ज्यांनी खोचकपणे टीका केली आहे.

महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, माझ्या नादाला लागू नका, आता गेलं ना तुमचं मुख्यमंत्री पद म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या मनसेच्या प्रवासाबद्दलही बोलत असताना सांगितले की, राज्यातील इतर कोणत्याही पक्षाने टोलनाक्यावर आंदोलन केले नाही मात्र मनसेने यावर आंदोलन करून महाराष्ट्रातील महत्वाचे टोलनाके बंद केले आहेत.

तर जे सत्तेत आहेत.त्यांना मात्र पत्रकार कोणतेही प्रश्न विचारत नाहीत की, महाराष्ट्ला टोलमुक्त करणार होता, त्याचं काय झालं हा सवाल माध्यमं का विचारत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी यावेळी वेगळेपण जपत गेल्या सतरा वर्षात पक्षाने काय केले, कोणती आंदोलने केली, कोणत्या जिल्हाध्यक्षांनी कोणाला न्याय मिळवून दिला या गोष्टींची त्यांनी डिजिटल पुस्तिकाही प्रदर्शित केली आहे.

यावेळी त्यांनी पक्षाच्या वाटचालीचा इतिहास सांगताना त्यांनी हेही सांगितले की, गेल्या सतरा वर्षात इतर पक्षांनी जी आंदोलनं केली नाहीत ती आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.