केमिकल लोचा म्हणत उद्धव ठाकरेंची पुन्हा नाव न घेता राज ठाकरेंवर टीका, बंडखोरांना मनसेत घेण्याचे संकेत दिल्यावरुन केली टीका

| Updated on: Jul 24, 2022 | 11:22 PM

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे जेव्हा एकाकी पडले होते. तेव्हा त्यांच्या पाठिशी राज ठाकरे उभे राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. राज ठाकरे या सगळ्या काळात शस्त्रक्रिया झाल्याने राजकारणापासून बाहेर होते. मात्र त्या काळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात गुवाहाटीहून फोनवर बोलणे झाले अशी चर्चा झाली होती.

केमिकल लोचा म्हणत उद्धव ठाकरेंची पुन्हा नाव न घेता राज ठाकरेंवर टीका, बंडखोरांना मनसेत घेण्याचे संकेत दिल्यावरुन केली टीका
बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार कोण? पुन्हा शिवसेना फुटल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणतात...
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. बंडखोर आमदार हे गद्दारच नाहीत, तर ते नमकहराम असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्ष आणि वडीलच हे आपल्यापासून पळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत हे बंडखोर नव्हेत तर दरेडोखोर असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. यात ओघात त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे आणि पक्षांतर बंदीचे नियम बदलले असल्याची माहितीही शिवसैनिकांना दिली आहे. आता फुटलेल्या बंडखोरांना (rebel MLAs)दुसऱ्या कुठल्यातही पक्षात जावे लागेल असेही त्यांनी सांगितले. याच निमित्ताने त्यांनी या सगळ्या बंडखोरीच्या काळात त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरही टीका केली आहे. हे सगळे बंडखोर राज ठाकरे यांच्या मनसेत जाऊ शकतील अशी चर्चा गेल्या काही काळापासून रंगते आहे. त्यावर राज ठाकरे यांनी असा प्रस्ताव आला तर विचार करु, असेही सांगितले आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. किती जणांचा केमिकल लोचा झाला आहे, असे विचारत त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे.

केमिकल लोचा या टीकेचा पुनरुच्चार

राज ठाकरे यांनी ठाकर सरकारच्या शेवटच्या काळात हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेतली होती. त्याचवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच त्यावेळी हिंदुत्वादी प्रतिमाही समोर येत होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्याप्रमाणे शाल गुंडाळून आरती करताना त्यांचे काही फोटो समोर आले होते. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी केमिकल लोचा झाला आहे. सिनेमात संजय दत्तला जसे महात्मा गांधी दिसत होते. तसेच काही जणांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. अशी शाल पांघरुन शिवसेनाप्रमुख होता येत नाही, अशा स्वरुपाची टीका राज ठाकरे यांचे नाव न घेता केली होती. कधी मराठीचा मुद्दा तर कधी हिंदुत्वाचा मुद्दा हा मुन्नाभाई घेत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीच्या काळात राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुन्नाभाई आणि केमिकल लोचाची आठवण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिकेत संघर्ष अधिक पेटणार

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे जेव्हा एकाकी पडले होते. तेव्हा त्यांच्या पाठिशी राज ठाकरे उभे राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. राज ठाकरे या सगळ्या काळात शस्त्रक्रिया झाल्याने राजकारणापासून बाहेर होते. मात्र त्या काळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात गुवाहाटीहून फोनवर बोलणे झाले अशी चर्चा झाली होती. तसेच अगदी गरज पडल्यास एकनाथ शिंदे त्यांचा पूर्ण गट घेऊन मनसेत जातील, अशीही चर्चा त्यावेळी सुरु झाली होती. पक्षांतर बंदी कायदा लागू झाल्यास, जर शिंदे यांचा गट वेगळा असेल तर त्याला इतर पक्षांत विलिन होण्याची गरज निर्माण होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा स्थितीत शिंदे गट भाजपात विलिन होणार की मनसेत विलिन होणार अशी चर्चा सुरु आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे कौतुक करणारे पत्रही राज ठाकरेंनी पाठवले होते. त्यानंतर फडणवीसांनी जाऊन राज ठाकरेंची भेटही घेतली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.