मुंबई : दादर-पॉन्डिचेरी (Dadar-Pondicherry) या लांब पल्ल्याच्या गाडीचे मागचे तीन डबे रेल्वे रुळावरुन (Derail) घसरल्याची माहिती समोर येते आहे. आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी (No causalities) झालेली नाही. त्याचप्रमाणे कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली. गाडी नंबर 11005 असा या गाडीचा नंबर आहे. दरम्यान, सुरुवातीला दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली. त्यानंतर हादरे बसल्यामुळे दोन्ही गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या. या घटनेनंतर मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दादर माटुंगा स्थानकादरम्यान, हा सगळा प्रकार घडला. मध्य रेल्वेच्या दादर मार्गावर झालेल्या या घटनेमुळे आता दादर पॉन्डिचेरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.
या गाडीतील प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून स्टेशन गाठण्यासाठी धावपळ केली. सुरुवातीला नेमकं काय झालंय, हे देखील प्रवाशांना कळायला काही मार्ग नव्हता. या संपूर्ण प्रकाराबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून आता नेमकी काय माहिती दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.
Video | Dadar जवळ दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनची एकमेकांना टक्कर झाल्याची माहिती, रेल्वे प्रवाशांचा खोळंबा @Central_Railway
#DadarTrain #Mumbai #BREAKING #BreakingNews pic.twitter.com/X6TCBJSJln— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2022
गदक एक्स्प्रेस आणि पॉन्डिचेरी एक्स्प्रेस या दोन्हीही गाड्या एकाच ठिकाणी एकाच ट्रॅकवर येत असताना ही घटना घडली. भरधाव वेगानं दोन्ही ट्रेन येत असल्याचं सांगितलं जातंय. पॉन्डिचेरी एक्स्प्रेसचे दोन डेब इंजिनची धडक बसून रुळावरुन खाली घसरले. अत्यंत भीतीदायक अशी ही घटना होती. या घटनेनंतर शॉर्टसर्किट झाल्याचाही दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातो. दरम्यान, वेग दोन्ही गाड्यांचा फार कमी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. तीन ते चार वेळा शॉर्ट सर्किट झालं. दरम्यान, ही धडक झाल्यानंतर प्रवाशांनीही तातडीनं गाडीतून खाली उतरत बाहेर येण्याचा प्रयत्न केला.
ही घटना कळल्यानंतर तातडीनं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाहीरी घटनास्थळी दाखल झाले. सध्या या मार्गावरली वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.