गणपतीच्या आरतीचे फोटो आल्यामुळे सुषमा अंधारे यांनी सरन्यायाधीशांना घेरले? थेट विचारला असा प्रश्न…

| Updated on: Oct 12, 2024 | 7:30 PM

Dasara Melava 2024: उद्या परवा आचारसंहिता लागणार आहे. आमचा न्याय अजून झाला नाही. आता न्याय झाला तर काय कामाचा. ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड अशी ही अवस्था आहे.

गणपतीच्या आरतीचे फोटो आल्यामुळे सुषमा अंधारे यांनी सरन्यायाधीशांना घेरले? थेट विचारला असा प्रश्न...
Sushama Andhare
Follow us on

शिवसेना ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेचे लक्ष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेतून सरन्यायाधीशसुद्धा सुटले नाही. त्या म्हणाल्या, फडणवीस साहेब या देशात घटनेला धोका आहे. तो अजूनही संपला नाही. त्याचे उदाहरण म्हणजे तुम्हीच घालून दिले. न्यायपालिका आणि कायदेमंडळ वेगवेगळे असले पाहिजे. न्यायापलिकेने स्वत:ची स्वायत्ता आबाधित ठेवली पाहिजे. त्यासाठी न्यायधीशपदाच्या व्यक्तीने स्वत:चे धार्मिक कल सर्वाजनिक करु नये. त्यानंतरही सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील तर त्याचा अर्थ काय करावा, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपतीच्या आरतीला गेले होते. त्याचे फोटो माध्यमांमध्ये आले. तो संदर्भ घेत सुषमा अंधारे यांनी सरन्यायाधीशांचे नाव न घेता त्या घटनेचा उल्लेख केला.

सुषमा अंधारे यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी भाजपने प्रयत्न केल्याचा दावाही खोडून काढला. त्या म्हणाल्या, देशाची घटना आंमलात आली तेव्हा आरक्षण सुरु झाले. १९६० मध्ये त्यांचा कार्यकाळ संपत होता. तो फक्त राजकीय आरक्षणाचा. शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण कायम स्वरुपी होते. १९६० मध्ये राजकीय आरक्षणाची काळमर्यादा काँग्रेसने वाढवली.

मग तो न्याय काय कामाचा

शिवसेना कोणाची यावरील याचिका सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्या परवा आचारसंहिता लागणार आहे. आमचा न्याय अजून झाला नाही. आता न्याय झाला तर काय कामाचा. ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड अशी ही अवस्था आहे. रामदास फुटाणे यांची कविता ऐकवत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केली. त्या म्हणाल्या, आता मी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वाक्य ऐकण्यासाठी लोक आतूर आहेत. त्यामुळे ही मशाल पेटत ठेवा. धगधगती ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

जमीन विकून पैसे देत आहेत का?

राज्यातील बहिणींना १५०० रुपये मिळतात ते काही फडणवीस यांनी नागपूरचा बंगला विकून दिला नाही. शिंदेंनी तापोळ्याची जमीन विकून दिले नाही. हे पैसे आमच्या कष्टाचे आहे. आमच्या राज्यातील नागरिकांनी जो टॅक्स भरला त्याचे हे पैसे आहे. तुम्ही पोस्टमन आहात. बेक्कार क्रेडिट घेऊ नका. आपण बहिणीच्या घरी गेल्यावर तिला पैसे देतो, तेव्हा काय बस स्टँडवर बॅनर लावला का? आपण बहिणीला पैसे दिल्यावर कधी जाहिरात बाजी करत नाही. कारण आपल्याला नातं आणि नात्याची मर्यादा कळते. आपण बहिणीच्या गरीबीची थट्टा केली नाही. आणि हे मात्र बॅनर लावून बहिणींची थट्टा करत आहे.