Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Jan 05, 2025 | 9:30 PM

Eknath Shinde Threat: धमकी देणारा हितेश धेंडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत

Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
Eknath Shinde Threat
Follow us on

Shiv Sena Leader Eknath Shinde Threat: शिवसेना नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे. ठाण्यातीलच श्रीनगर भागात राहणार एका 24 वर्षीय तरुणाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यासंदर्भातील पोस्ट त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणे गाठले. अखेर पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

इंस्टाग्रामवर टाकली पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा तरुणाचे नाव हितेश प्रभाकर धेंडे (वय-24 ) आहे. तो ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा या भागात राहतो. त्याने एकनाथ शिंदे यांना जीव मारण्याची धमकी देणारी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली. त्यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भात बोलताना ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी म्हणाले, धेंडे याने एकनाथ शिंदे साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिविगाळ करणारी पोस्ट टाकली. रात्री त्यांचा घरावर गोळीबार करणार अशी पोस्ट त्याने इंस्टग्रामवर केली होती.

https://www.youtube.com/watch?v=K-kGKYCuntc

हे सुद्धा वाचा

त्या तरुणावर गुन्हा दाखल

हितेश धेंडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.

यासंदर्भात बोलताना शिवसेना पदाधिकारींना सांगितले की, एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणारी पोस्ट त्या तरुणाने का केली, कशासाठी केली त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांना धमकी देण्यापर्यंत त्याची मजल कशी गेली? यासंदर्भात शोध घेतला पाहिजे. धमकी देणारा तरुण विकृत प्रवृत्तीचा आहे, असेही सांगितले जात आहे. त्याचावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आता आमचे कार्यकर्ते त्याचा शोध घेण्यासाठी फिरत आहे.