मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने घडत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या तुलनेवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. शिवरायांच्या गनिमी काव्याबद्दल बोलताना संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांची थेट शिवाजी महाराज यांच्यासोबतच तुलना केली आहे.
या शिवाजी महाराजांच्या या बदनामीवर बोलताना संजय राऊत यांनी महाराजांच्या बदनामीची स्पर्धा चालू आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काल भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली होती तर त्यानंतर आता शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याची तुलना आता आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पु्न्हा एकदा ढवळून निघालं आहे.
या दोन्ही घटनेतील विरोधाभास म्हणजे एकीकडे संजय गायकवाड यांनीच मंगल प्रभात लोढ यांच्या विधानाला चूक ठरवलं आहे तर आणि त्यावरच बोलताना दुसरीकडे गनिमी काव्याची तुलना एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाने संजय गायकवाड यांच्या तुलनेचं समर्थन केले आहे आणि विरोधक मात्र सरकारकडून वारंवार महापुरुषांची बदनामी सुरु असल्याचा आरोप करत आहे.
भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. लोढांनी जे विधान केलं आहे त्यावर त्यांनी नंतर बक्श दो म्हणत माफी मागितली आहे, मात्र लोढा काहीही चुकीचं बोलले नसल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
तर आता जेव्हा संजय गायकवाड यांनी शिवरायांच्या गनिमी काव्याची तुलना एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली आहे तेव्हाही शिंदे गट त्या विधानाची पाठराखण करत असल्याचे दिसून आले आहे.