मुंबई : लालबागाच राजाच्या (Lalbaugcha raja 2021) प्राणप्रतिष्ठापणा पूजेस विलंब झाला आहे. सकाळी 10.30 वाजता उत्सव गणेशमूर्तीची विधीवत पूजा सुरू करुन सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन सुरू करण्याचं नियोजन होतं. मात्र मुंबई पोलीस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात तासाभरापासून चर्चा सुरू असल्याने पूजेस विलंब झाला.
लालबागच्या राजाची स्थापना करणारे, स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केलीत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाही. मग स्थानिक रहिवाशांची दुकानं का बंद करण्यात आलीत, असा प्रश्न लालबाग मार्केटमधील रहिवाशी विचारत आहेत.
मुंबई पोलिसांच्या सुरक्षा कारणास्तव लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी त्रस्तं आहेत. त्यांना त्यांच्याच घरी येण्या जाण्यासाठी पोलिसांकडून अटकाव करण्यात येतोय. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही स्थानिक रहिवाशांच्या मागणीवर ठाम रहात पोलिसांशी मागण्यांवर चर्चा सूरू केलीय. त्यामुळे लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस विलंब होतोय. मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा करण्यासाठी दाखल होत आहेत.
पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.
राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
संबंधित बातम्या
नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, लालबागमध्ये जाऊन नांगरे पाटलांनी ठणकावलं
मुंबईतही कलम 144, गणेशोत्सवात जमावबंदी आदेश, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई