गिरगावात ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांच्या नावाचा पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन

| Updated on: Nov 30, 2023 | 1:52 PM

मुंबई शहरात नव्याने भेट देणारे किंवा पर्यटक यांना मुंबईतील चौकांना असलेल्या महनीय व्यक्तींच्या नावाचे फलक वाचताना त्यांच्याबद्दल माहीती नीट मिळत नाही. त्यामुळे आता या नामफलकांवर 'क्यूआर' कोडद्वारे संबंधित महनीय व्यक्तीची माहीती समाविष्ठ करण्यात आली आहे.

गिरगावात ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांच्या नावाचा पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन
sudhir phadke
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील गिरगावातील गावदेवी परिसरात एका चौकाला संगीतरत्न सुधीर फडके यांचे नाव देण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला हा मुंबईतील पहिला क्यूआर कोड आहे. या पहिल्या क्यूआर कोड चौकाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गुरुवारी सायंकाळी होणार आहे. या उद्घाटनाच्या सोहळ्याला ज्येष्ठ गायक आणि संगीतकार स्वर्गीय सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके गीतरामायणाचा कार्यक्रम सादर करणार असून संगीतप्रेमींसाठी ही अनोखी मेजवाणी असणार आहे.

संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या अजरामर गीतांची मोहीनी आजही रसिक चाहत्यांच्या मनावर कायम आहे. त्यांच्या अवीट गाण्यांची ओढ जुन्या पिढीला आहे. परंतू ती ओळख परदेशी पर्यटक आणि नवीन पिढीला देखील व्हावी यासाठी मुंबईत गिरगावात पहिला आगळा वेगळा उपक्रम राबविला जात आहे. मुंबईतील पहिल्या ‘क्यूआर’ कोड चौकाचा फलकाचे अनावरण मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबईत येणारे पर्यटक तसेच नवीन व्यक्तींना या नामफलकावरील ‘क्यूआर कोड’ आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करताच त्यांच्याबद्दलची सर्व इत्यंभूत माहीती मिळण्यास मदत मिळणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून अशा पद्धतीच्या पहिल्या ‘क्यूआर’ कोड नाम फलकाचे अनावरण सायंकाळी गिरगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

‘क्यूआर कोड’ चौकाचे वेगळेपण काय ?

कलारत्नांचे, महापुरुषांचे, थोर संतांचे, विचारवंतांचे पुतळे किंवा त्यांची नावे अनेक चौकांना किंवा रस्त्यांना दिली जातात. परंतू शहरात येणाऱ्या पर्यटकांना अथवा नवीन पिढीला त्यांच्याबाबत योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकदा पुतळा कोणाचा आहे? अथवा या चौकाला ज्यांचे नाव दिलंय ते कोण आहेत ? असे साधे प्रश्न पर्यटकांकडून विचारले जातात त्यावेळी त्यांची माहीती मिळण्यास विलंब होतो. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून गावदेवीत ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांचे नाव एका चौकाला दिले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा नवीन व्यक्तीला नामफलकावर लावलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करताच गायक सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.