राज्यात सरकारचं अस्तित्व नाही अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

| Updated on: Nov 16, 2021 | 6:13 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं मला वाटतं, असं विधान केलं होतं. आता त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनता मुख्यमंत्री मानायला तयार नाही, असं विधान केलं आहे.

राज्यात सरकारचं अस्तित्व नाही अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
devendra fadnavis
Follow us on

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं मला वाटतं, असं विधान केलं होतं. आता त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनता मुख्यमंत्री मानायला तयार नाही, असं विधान केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकारिणीला संबोधित करताना हे विधान केलं. सध्या महाराष्ट्रावर विश्वासहार्यतेचं संकट उभं राहिलं आहे. देशातील सर्वाधिक प्रगतीशील, सर्वाधिक समृद्ध आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य आहे. पण या राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वतच्या पलिकडे पाहायला तयार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती बरी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

राज्यातील जनता होरपळतेय

राज्यातील जनता रोज होरपळते आहे. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. कोणी राज्य म्हणून विचार करत नाही. कोणी जनतेचा विचार करत नाही. कोणी समस्यांचा विचार करत नाही. खरे म्हणजे पाच वर्ष आपलं सरकार होतं. आपल्या सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, डिजीटल इंडिया, सर्वांना घरे देणं… या मुद्द्यांवर आपण चर्चा करायचो. पण आज परिस्थिती काय? तर आज या सरकारमध्ये गांजावर चर्चा होते. हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बदली, खंडणी यावर चर्चा होते. पण शेतकरी आणि गोरगरिबांवर चर्चा होत नाही. या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही, असं ते म्हणाले.

निर्लज्जांवर परिणाम होतो असं नाही

सुधीरभाऊंनी चांगला राजकीय प्रस्ताव मांडला. या सरकारचे कपडे काढले. पण सुधीर भाऊ यांचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरवावेच लागेल. आता कोरोना आहे म्हणून ते आम्हाला थांबवू शकत नाही. दोन वर्ष कोरोना आहे म्हणून ते आम्हाला रोखत होते. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते. पण आता ते आम्हाला रोखू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

हिंदूंची दुकाने जळू देणार नाही

आम्ही दंगल करणारे लोक नाही. भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आम्ही हिंदूंची दुकाने जळू देणार नाही. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच आम्हाला कुणालाही घाबरण्याचं काम नाही. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. जेव्हा वर्षातून बाहेर पडलो. तेव्हा चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. स्वत:चं घर नव्हतं. त्यामुळे घाबरण्याचं काम नाही, असं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

गव्हाचा पेरा झाला अन् ग्राहकही ठरले, औरंगाबादमध्ये अनोखा उपक्रम

Amravati Violence : पोलिसांच्या विनंतीनंतरही किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर ठाम, पोलीस काय कारवाई करणार?

प्रोटेक्ट टू Crime आणि प्रोटेक्ट टू Terrorism सरकारची भूमिका; भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप