मुंबई:विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोकर भरती घोटाळ्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे विधानसभेत आभार मानलं. प्रकाश शेंडगे यांच्याकडे असलेल्या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी रेटकार्ड आणि मोडस ऑपरेंडी विधानसभेत वाचून दाखवण्यात आली.
अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2021 ला अपात्र ठरवलं गेलं. त्यानंतर 4 मार्च 2021 ला हायकोर्टाच्या निर्णयानं पात्र केलं. मात्र, चार कंपन्या डावलून न्यासाला काम दिलं. त्यानंतर आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाला. म्हाडा भरतीत घोटाळा झाला. टीईटी मध्ये घोटाळा झाला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही. हे सगळे घोटाळे या ठिकाणी चालले आहेत. 25 आणि 26 सप्टेंबरला परीक्षा घेतली. न्यासानं या परीक्षेत पेपर फोडण्यापासून सर्व गोष्टी फोडण्यापर्यंत सर्व काम केली आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माजी आमदारांचं अभिनंदन करेल. त्यांच्याकडे ध्वनीफित आहे. एका पदासाठी काय बोली लागलीय त्याची माहिती यामध्ये देण्यात आलीय. नवी मुंबईतल्या उमेदवाराला औरंगाबाद, अमरावतीच्या उमेदवाराला जळगावचं केंद्र, विदर्भातल्या उमेदवाराला रत्नागिरीतलं केंद्र मिळालं एकाला नवी दिल्लीतील केंद्र मिळालं, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 4 लाख 61 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. प्रकाश शेंडगेंनी एक ऑडिओ क्लिप समोर आणली. न्यासा कंपनीचा दलाल नियुक्तीची हमी देत होता. क गटासाठी 15 लाख आणि ड गटासाठी 8 लाख रुपयाचं रेटकार्ड दलाल सांगत होता. त्या कंपनीचा दलाल अमरावतीमधल्या 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिल्याचा दावा दलाल करतोय. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. दोन वेगवेगळ्या दिवशी परीक्षा झाल्या. सात दिवसांनी घेण्यात आलेल्या परीक्षांचा पेपर सारखा होता. मंत्रालयापर्यंत तार चालले आहेत. महेश बोटलेला अटक झाल्यानंतर लातूर विभागातील प्रशांत बडगिरे,सह 12 जणांना अटक झाली. संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेल्या होत्या. त्याच्या ड्रायव्हरकडे प्रश्नपत्रिका मिळाल्या. तीस लाखांची डील झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. प्रश्नपत्रिका पुरवण्यासाठी 6 लाखांचं डील झाल्याचे पुरावे असल्याचं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जीए सॉफ्टवेअर काळ्या यादीत होती. तीन महिन्यात काळ्या यादीतून बाहेर काढून त्यांना सर्व कामं दिली आहेत. अध्यक्षमहोदय स्थगन प्रस्ताव नाकारणार असाल तर गंभीर आहे. उद्या चर्चा लावावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत जात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षनेत्यांनी चौकशीची मागणी केलेली योग्य आहे. घोटाळ्याची तार कुठं जात आहे त्याची माहिती आमच्याकडेही आहे, असं नाना पटोले म्हणाले.
ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक
Devendra Fadnavis demanded discussion on Health Department, Mhada and Tet exam scam in Maharashtra Assembly and declare rate card