माझ्यावर वेळ आली तर ते ऑडिओ व्हिजवल सार्वजनिक करेल, फडणवीसांचा इशारा कुणाला?

| Updated on: Jul 24, 2024 | 5:15 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मी राजकारण करत नाही. पण कोणी माझ्या नादी लागलं तर मी सोडत पण नाही. फडणवीस यांनी हा इशारा विरोधकांना दिला आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर ही नाव न घेता टीका केली.

माझ्यावर वेळ आली तर ते ऑडिओ व्हिजवल सार्वजनिक करेल, फडणवीसांचा इशारा कुणाला?
Follow us on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. फडणवीसांनी अनिल देशमुख यांना पण टार्गेट केलं. के म्हणाले की, ‘खरं म्हणजे सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की, कशाप्रकारे गिरीष महाजन यांच्यावर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, त्यांना मोक्का लागावा यासाठी वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. गुन्हे दाखल करायला लावले. या संदर्भातील पुरावे मी दिले होते. त्यानंतरच सीबीआयने केस दाखल केली. सीबीआयने कोर्टात चार्जशिट दाखल केली आहे. महाविकासआघाडीच्या सरकारने कशाप्रकारे विरोधी पक्षातील आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेस लावणे हे प्रकार सुरु होते. हे आपण पाहिले आहे.’

इको सिस्टममध्ये सुपारीबाज लोकं घुसले

‘श्याम मानव इतके वर्ष मला ओळखतात. त्यांनी अशा प्रकारे आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. मला असं वाटतं इको सिस्टममध्ये आता सुपारीबाज लोकं घुसले आहे. सुपारी घेऊन बोलणारे लोकं घुसले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का. एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकासआघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते काय सुटले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीयेत. १०० कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.’

माझ्यावर वेळ आली तर सर्व सार्वजनिक करेल – फडणवीस

‘मी स्पष्टपणे सांगतो कारण त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिजवल मला आणून दिले आहेत. त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे, वाझेवर काय बोलताय ते सगळं माझ्या कडे आहे. माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करेल. रोज जर कोणी खोटं बोलून नरेटिव्ह सेट करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे मी पुराव्य़ा शिवाय काहीही बोलत नाही.’

‘मनोज जरांगे यांची केस २०१३ ची केस आहे. यापूर्वी आधीच त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघतं. पण तारखेवर हजर राहिलं तर ते रद्द होते. पुन्हा ते तारखेवर गेले नाही तर त्यांचा वॉरंट रद्द होईल. आमचा त्यात काहीही संबंध नाही. मी त्यांना दोष देणार नाही. उपोषणाच्या शेवटी ते माझ्य़ा आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली होती. उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता असं त्यांनी सांगितलं होतं.’

देवेंद्र फडणवीसला टार्गेट करुन कोणाला फायदा आहे. फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते. असं त्यांनी शेवटी म्हटले आहे.